Dharmendra Pradhan : मंत्रिदाचा राजीनामा, धर्मेंद्र प्रधान यांची संपत्ती जगजाहीर, पण गुंतवणूक किती? पहिल्यांदाच आकडा समोर

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. धर्मेंद्र प्रधान हे कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांनी विविध ठिकाणी गुंतवणूक देखील केली आहे.

Dharmendra Pradhan : मंत्रिदाचा राजीनामा, धर्मेंद्र प्रधान यांची संपत्ती जगजाहीर, पण गुंतवणूक किती? पहिल्यांदाच आकडा समोर
dharmendra pradhan
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 25, 2026 | 7:23 PM

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला अखेर मोठं यश प्राप्त झालं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नीट पेपर फुटी प्रकरणानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्याने कॉकरोच जनता पार्टीकडून सुरु होती, त्यासाठी मोठं आंदोलन देखील उभारण्यात आलं. अखेर त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, त्यांनी आपल्या ट्विटर अकांऊटवरून ते शिक्षण मंत्री असल्याची माहिती देखील हटवली आहे, आता त्यांच्या ट्विटरवर फक्त ते खासदार असल्याची माहिती ठेवण्यात आली आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा धर्मेंद्र प्रधान यांची संपत्ती चर्चेत आली आहे.

धर्मेंद्र प्रधान किती संपत्तीचे मालक? 

निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रानुसार धर्मेंद्र प्रधान आणि त्यांचं कुटुंब कोट्यवधि रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. या संपत्तीमध्ये, स्थावर, जंगम मालमत्ता तसेच गुंतवणूक यांचा समावेश आहे.  धर्मेंद्र प्रधान यांच्या पत्नी मृदुला ठाकूर यांच्या नावावर देखील कोट्यवधि रुपयांची संपत्ती आहे. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रानुसार धर्मेंद्र प्रधान यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नीचं वार्षिक उत्पन्न हे अधिक आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये धर्मेंद्र प्रधान यांचं एकूण वार्षिक उत्पन्न हे 12.74 लाख रुपये इतकं होतं. तर त्यांच्या पत्नीचं वार्षिक उत्पन्न हे जवळपास 49 लाख रुपयांच्या आसपास होतं.

गुंतवणूक किती? 

निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथ पत्रानुसार धर्मेंद्र प्रधान यांच्या कुटुंबानं कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. बँकेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जमा आहे. धर्मेंद्र प्रधान आणि त्यांच्या कुटुंबाकडून म्युचुअल फंड, काही विमान योजना, तसेच इतर आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे. तसेच सोन्यामध्ये देखील गुंतवणूक करण्यात आली आहे. धर्मेंद्र प्रधान आणि त्यांच्या कुटुंबाच्या मालकीची जमीन देखील आहे. त्यांच्याकडे असलेल्या एकूण संपत्तीचा  आकडा हा जवळपास 6 कोटी 92 लाख रुपयांच्या आसपास आहे.  धर्मेंद्र प्रधान यांच्या पत्नीचं उत्पन्न हे त्यांच्यापेक्षा अधिक आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us