Brahmos Missile : पाकिस्तानच मनोबल उद्ध्वस्त करणाऱ्या एका ब्रह्मोस मिसाइलची किंमत किती कोटी रुपये ?

Brahmos Missile : भारताने पाकिस्तानसोबतच्या तीन दिवसाच्या सैन्य संघर्षात ब्रह्मोस मिसाइलचा वापर केल्याचे संकेत मिळत आहेत. सुपरसॉनिक ब्रह्मोस मिसाइलची रेंज 290 किलोमीटर आहे. पाकिस्तानच मनोबल ज्या ब्रह्मोस मिसाइलने तोडलं, त्या एका मिसाईलची किंमत किती आहे? तुम्हाला माहित आहे का?

Brahmos Missile : पाकिस्तानच मनोबल उद्ध्वस्त करणाऱ्या एका ब्रह्मोस मिसाइलची किंमत किती कोटी रुपये ?
brahmos
| Updated on: May 12, 2025 | 10:34 AM

भारत-पाकिस्तानमध्ये 10 मे रोजी सीजफायर झालं. पण त्याआधी भारताने पाकिस्तानच्या आतमध्ये खोलवर घुसून प्रचंड मोठे प्रहार केले. त्यात मेड इन इंडिया सुपरसोनिक क्रूज ब्रह्मोस मिसाइलने महत्त्वाची भूमिका बजावली. 22 एप्रिल रोजी पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे 26 निरपराध भारतीय पर्यटकांची हत्या केली. त्यानंतर तणाव सुरु झाला. भारताने प्रत्युत्तर म्हणून 7 मे रोजी पाकिस्तानात एअर स्ट्राइक केला. त्यांचे 9 दहशतवादी अड्डे उद्धवस्त केले. यात 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. यासाठी भारताने आपलं मेड इन इंडिया सुपरसोनिक क्रूज ब्रह्मोस मिसाइल वापरलं. या मिसाइलने पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टिमला चकवा देऊन पाकिस्तानातील दहशतवादी ट्रेनिंग तळ कब्रस्तानमध्ये बदलले.

7 मे च्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानने भारतावर मिसाइल आणि ड्रोनने हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने त्यांचे सर्व हल्ले परतवून लावले. पाकिस्तानच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ब्रह्मोस मिसाइलद्वारे पाकिस्तानातील एअरबेसवर हल्ला चढवला. यात त्यांचे हे बेस उद्ध्वस्त झाले.

किती हजार कोटी खर्च?

ब्रह्मोस मिसाइल भारत आणि रशियाने मिळून तयार केलय. भारताच्या ब्रह्मपुत्र आणि रशियाच्या मोस्कोवा नदीवरुन या मिसाइलच ब्रह्मोस नाव ठेवण्यात आलय. या मिसाइलला डेवलप करण्यासाठी 250 मिलियन डॉलर खर्च झालाय. आजच्या हिशोबाने हा खर्च 2,135 कोटी रुपये होतो. या प्रोजेक्टमध्ये भारताच आर्थिक योगदान 50.5% आणि रशियाचं 49.5% आहे. ब्रह्मोस मिसाइलच्या ऑफिशियल किंमतीबाबत अजूनपर्यंत काही माहिती नाहीय. पण मीडिया रिपोर्टनुसार, ब्रह्मोसच्या प्रोडक्शन यूनिटचा खर्च जवळपास 300 कोटी रुपये आहे. एका मिसाइलची किंमत जवळपास 34 कोटी रुपये आहे.

किती किलो स्फोटकं ब्रह्मोसमधून नेता येतात?

सुपरसॉनिक ब्रह्मोस मिसाइलची रेंज 290 किलोमीटर आहे. याच्या Advance वर्जनची रेंज 500 ते 800 किलोमीटर आहे. हे मिसाइल 200 ते 300 किलोग्रॅम हाय एक्सप्लोसिव म्हणजे स्फोटकं घेऊन जाण्यास सक्षम आहे. सोबतच हे मिसाइल शत्रूच्या एअर डिफेन्स सिस्टिमला चकवा देऊन टार्गेट उद्धवस्त करण्यास सक्षम आहे.