या मंदिरात आधी व्हायचे भरपूर विवाह, परंतू अचानक लागली बंदी, असे काय घडले ?

Someshwara Swamy Mandir: या प्राचीन मंदिरात अनेक वर्षांपासून विवाह समारंभ धुमधडाक्यात व्हायचे आता अचानक गेल्या काही वर्षांपासून सर्व विवाह समारंभावर बंदी घातली आहे.

या मंदिरात आधी व्हायचे भरपूर विवाह, परंतू अचानक लागली बंदी, असे काय घडले ?
Someshwara Swamy Temple
| Updated on: Nov 26, 2025 | 5:03 PM

Someshwara Swamy Temple: कर्नाटक राज्यातील बंगळुरु स्थित हलासुरु येथील सोमेश्वर स्वामी मंदिरात गेल्या काही वर्षांपासून विवाहाचे कार्यक्रम बंद आहेत. या संदर्भात मंदिराच्या व्यवस्थापन स्पष्टीकरण दिले आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार या मंदिरा संदर्भात चुकीची माहिती पसरण्यापासून रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. श्री सोमेश्वर स्वामी मंदिरात गेल्यातेवर्षांपासून विवाह समारंभ बंद आहेत.

याआधी मंदिरात विवाह करणाऱ्या जोडप्यांचे पुढे एकमेकांशी बिनसायचे तेव्हा ते कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज करायचे. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी दरम्यान कोर्टात पुजाऱ्यांनाही जबाबसाठी समन्स यायचे. याच कारणांमुळे पुजाऱ्यांनी या मंदिरात विवाह लावण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या मंदिरात विवाह समारंभ करण्यास आपोआप बंदी आली आहे.

मंदिराचे कार्यकारी अधिकारी काय म्हणाले ?

सोमेश्वर स्वामी मंदिराची प्रतिमा डागाळली जाऊ लागली होती आणि मंदिरा संदर्भात चुकीची माहिती प्रसारित होऊ लागली त्यामुळे मंदिराची प्रतिष्ठा  वाचण्यासाठी व्यवस्थापन बोर्डाने मंदिरातील विवाह थांबवण्याचा हा निर्णय घेतला आहे. या मंदिरातील सध्याचे कार्यकारी अधिकाऱ्याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की माजी कार्यकारी अधिकाऱ्यांनी तोंडी विभागीय वरिष्ठांना या संदर्भात अवगत केले होते. आणि सोमेश्वर स्वामी मंदिरातील विवाह रोखण्यात आले आहेत. मंदिरातील विवाह समारंभ थांबवल्याने आता मंदिरातील पुजाऱ्यांचा कोर्टात जाण्याचे खेटे वाचले आहेत. त्यामुळे त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. 

देवांचा देव महादेवाचे मंदिर

सोमेश्वर स्वामी मंदिरातील देवांचे देव महादेव यांचे हे मंदिर आहे. हे मंदिर शिव-पार्वती दोन्हींना समर्पित आहे. हे मंदिर ऐतिहासिक दृष्टीकोणातूनही खूपच प्रसिद्ध आहे. या मंदिराचा इतिहास चोल वंशाच्या काळातील असल्याचे म्हटले जात आहे. या कारणामुळे या मंदिराची गणना भगवान शंकराच्या सर्वात जुन्याय मंदिरात केली जाते. या मंदिराच्या भिंतीवर विजयनगर शैलीतील वास्तुकला पाहायला मिळतात. याच कारणांमुळे मंदिराच्या भिंतीवर विजयनगरातील शैलीची वास्तुकला पहायला मिळते. या कारणांमुळे येथील नक्षीकाम लोकांना आवडते आणि आकर्षित करत असते.