5 दहशतवादी, 180 प्रवासी, 3 मोठ्या मागण्या.. देशाला हादरवून टाकणाऱ्या ‘IC 814: कंदाहार हायजॅक’ची A टू Z कहाणी

'IC 814' या विमान अपहरणाच्या घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं. तीन मोठ्या मागण्यांसाठी पाच दहशतवाद्यांनी या विमानाचं अपहरण केलं होतं. हे अपहरण कसं झालं, दहशतवाद्यांच्या मागण्या काय होत्या, प्रवाशांची सुटका कशी झाली, याविषयीची सविस्तर माहिती..

5 दहशतवादी, 180 प्रवासी, 3 मोठ्या मागण्या.. देशाला हादरवून टाकणाऱ्या IC 814: कंदाहार हायजॅकची A टू Z कहाणी
IC 814 Kandahar hijack
Image Credit source: Tv9
| Updated on: Sep 06, 2024 | 12:47 PM

1999 मध्ये झालेल्या ‘आयसी 814’ या विमान अपहरणाच्या घटनेचा उल्लेख भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठी घटना म्हणून केला जातो. नेपाळच्या काठमांडूहून भारतातील दिल्लीपर्यंत येणाऱ्या इंडियन एअरलाइन्सच्या आयसी 814 या विमानाचं उड्डाण केल्यानंतर काही क्षणांत पाच दहशवाद्यांनी अपहरण केलं. अपहरण केलेलं विमान त्यातील 180 प्रवाशांसह सात दिवस अफगाणिस्तानातील कंदाहार इथं ठेवण्यात आलं होतं. यात एका तरुणाला आपला जीवदेखील गमवावा लागला होता. याच घटनेवर आधारित ‘IC 814: द कंदाहार हायजॅक’ ही वेब सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. या सीरिजवरून सध्या मोठा वाद सुरू आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर कंदाहार हायजॅक नक्की का करण्यात आलं होतं, अपहरणकर्त्यांचा नेमका उद्देश काय होता, हे हायजॅक कसं करण्यात आलं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.. 24 डिसेंबर 1999 रोजी दुपारी पाच जणांनी सरकारी मालकीच्या इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचं अपहरण केलं होतं. दहशतवाद्यांशी चर्चा, तीन दहशतवाद्यांची सुटका, तालिबानचा सहभाग...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा