जेव्हा नरेंद्र मोदी यांनी ट्रेनची सीट सोडली आणि ट्रेनमधील दोन महिलांना दिली जागा…

टीटीईने ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी आहे, परंतू तुम्ही काळजी करु नका असे या महिलांना आश्वस्त केले. टीटीई त्यांना घेऊन खादी घातलेल्या दोन प्रवाशांकडे घेऊन गेले. टीटीई म्हणाले हे लोक रेग्युलर असून खूप चांगले लोक आहेत.

जेव्हा नरेंद्र मोदी यांनी ट्रेनची सीट सोडली आणि ट्रेनमधील दोन महिलांना दिली जागा...
pm modi birthday
| Updated on: Sep 17, 2026 | 7:06 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७६ वा वाढदिवस सर्वत्र साजरा केला जात आहे. परंतू ३६ वर्षांपूर्वी १९९० मध्ये नरेंद मोदी यांनी प्रवासात आपली रिझर्व्ह बर्थ रेल्वेच्या प्रवासात दोन महिलांसाठी सोडली होती हे अनेकांना माहिती नसेल. साल १९९० मध्ये दोन खाकी परिधान केलेले संघ प्रचारक ट्रेनमधून प्रवास करत होते. त्यावेळी त्यांनी आपली सीट सहज देऊ केली आणि हे दोघेही ट्रेनमध्ये खाली पथारी पसरुन झोपले…

या दोन महिला पैकी एक लीना शर्मा यांनी त्या भारतीय रेल्वे सेंटर फॉर रेलवे इन्फर्मेशन सिस्टममध्ये जनरल मॅनेजर असताना ‘द हिंदू’ मध्ये एक लेख लिहून ही घटना विशद केली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असल्याने या लेखाने एकच खळबळ उडाली. लीना शर्मा यांनी या घटनेसंदर्भात लेखात लिहीले होते. जो लेख ट्वीटरवर एवढा ट्रेंड होतोय तो लेख आपण १९९५ मध्ये आसाम येथील एका वृत्तपत्रात लिहीला होता असे लीना यांनी नंतर सांगितले.

लीना शर्मा त्यांची मैत्रीण उत्पलपर्ण हजारिका यांच्या सोबत १९९० मध्ये ट्रेनिंगसाठी लखनऊ ते दिल्लीला येत होत्या. ट्रेनच्या कोचमध्ये दोन खासदार देखील होते. खासदारांसोबत रिझर्व्हेशन नसलेल्या १२ लोकांनी गोंधळ घातला होता. या महिलांना त्यांच्या आरक्षित सीटवरुन हटवले होते. आणि त्या दोघी महिलांना त्यांच्या सामानावर बसावे लागले होते. त्यामुळे या महिला नाराज होत्या.

त्या घटनेमुळे लीना यांची मैत्रीणीने पुढच्या प्रशिक्षणासाठी अहमदाबादला जाण्याचा निर्णय घेतला. लीना यांनी त्यांची मैत्रीण उत्पलपर्ण हजारिका ( कार्यकारी संचालक, रेल्वे बोर्ड ) यांच्यासोबत अहमदाबादसाठी ट्रेन पकडली. त्यांचे सीट आरक्षित झाली नव्हती. त्यांनी फर्स्ट क्लासच्या बोगीतील टीटीईची भेट घेतली. टीटीईने ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी आहे, परंतू तुम्ही काळजी करु नका असे आश्वस्त केले. टीटीई त्यांना घेऊन खादी घातलेल्या दोन प्रवाशांकडे नेले. टीटीई म्हणाले हे लोक रेग्युलर असून खूप चांगले लोक आहेत.

दोन्ही नेत्यांनी आपली सीट रिकामी केली

चौघा जणांमध्ये खूप चर्चा झाली. टीटीईने नंतर येऊन सांगितले की जर कोणती सीट  मिळालीच नाही तर दोन्ही नेत्यांनी म्हटले आहे की ते मॅनेज करतील. दोन्ही नेत्यांनी आपली सीट त्या महिलांसाठी रिकामी केली. खाली चादर अंथरुन ते  झोपले. लीना यांना आदल्या दिवशी आरक्षण असतानाचा आलेला अनुभव आणि दुसऱ्या दिवशी आरक्षण नसताना मिळालेला सुखद अनुभव आला. त्या हा अनुभव कधीच विसरल्या नाहीत. ट्रेनमधून उतरताना त्यांनी त्या दोन नेत्यांची नावे विचारुन डायरीत लिहीली. एक होते शंकर सिंह वाघेला आणि दुसरे होते नरेंद्र मोदी…

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us