21 ते 28 सप्टेंबरपर्यंत आठवडाभर धो,धो,धो, राज्यभरात कुठे किती पाऊस, हवामान विभागाचा नवा अंदाज
सप्टेंबरच्या अखेर पुन्हा पावसाचे धुमशान होणार असून राज्यभरात सलग सात दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यभरात आता पावसाचे पुन्हा धुमशान घालण्याचा बेत रचला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता सप्टेंबर अखेर राज्यात पाऊस धुमाकुळ घालणार आहे. सप्टेंबरच्या महिन्यातील हा पाऊस परतीच्या पावसाप्रमाणे धो, धो, धो, बरसणार असा हवामान खात्याचा अंदाज आहे. येत्या 21 ते 28 सप्टेंबर दरम्यान सात दिवस हा पाऊस राज्याच्या मध्यवर्ती भागात कोसळण्याचा अंदाज आहे. तसेच मुंबई कोकण विभाग आणि घाटमाथ्यावरही पावसाचा जोर असेल असे हवामान विभागाने म्हटले आहे.
सप्टेंबर महिन्याच्या अखेर पावसाचा पुन्हा जोर वाढेल असे हवामान विभागाने म्हटले होते. राज्यात 21 ते 28 सप्टेंबर असा सात दिवस पावसाच्या धारा बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्या आहेत. कदाचित हा पाऊस परतीच्या पावसासारखा जोरदार असण्याची शक्यता आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा झाल्याने हा पाऊस बरसणार असल्याचे म्हटले जात आहे.
येथे पोस्ट पाहा –
17 Sept, #ECMWF shows 7 day mean anomalies of rainfall accumulation amts for period 21 Sept to 28 Sept. Most parts of #Maharashtra looks in favor for rainfall with higher sides interiors too. Looks like last leg of the season. This could give part relief here. Let’s keep watch pic.twitter.com/T1J8GhSjCY
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 17, 2026
राज्यात अनेक भागात तापमानातही वाढ झाली आहे. परभणीत 36.2°c, अहिल्यानगर 33.8°c, उदगीर 35°c, मालेगाव 34.4°c, सोलापूर 37.8°c असे तापमान नोंदले गेले आहे. त्यामुळे एकीकडे राज्यात सोलापूर, नांदेड, मराठवाड्यातील अनेक भागात पावसाअभावी कोरडा दुष्काळ ( अवर्षण ) पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मराठवाड्यात यंदा पेरणीनंतर पावसाने पाठ फिरवल्याने जलसंकट गडद होत आहे. पिके करपून चालली असून सलग 35 दिवसांपासून पाऊसच झाला नसल्याने दुष्काळाची दाट छाया पडली आहे. जलसंपदा विभाग आणि मराठवाडा विभागीय आयुक्तालयांच्या 7 सप्टेंबर 2026 पर्यंतच्या ताज्या आकडेवारीनुसार, संपूर्ण छत्रपती संभाजीनगर विभागात पावसाचे प्रमाण घटले आहे. अनेक प्रमुख धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरण साठ्यात मोठी घट नोंदविली गेली आहे.
