एकाच घरातून सलग 3 दिवस 30 साप बाहेर पडले, ग्रामस्थांनी खोदलं घर, समोरच दृश्य पाहाताच फुटला घाम, विश्वासच बसना
एक धक्कादायक घटना समोर आली आहे, एकाच घरातून सलग तीन दिवस साप बाहेर पडत होते. त्यानंतर गावकऱ्यांनी ते संपूर्ण घर खोदण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर समोरचं दृश्य पाहून सर्वांनाच घाम फुटला.

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील एका घरातून एकापाठोपाठ एक असे एकाचवेळी अनेक साप निघण्यास सुरुवात झाली. हे सर्व साप अत्यंत विषारी असलेल्या नाग ज्याला कोब्रा असं देखील म्हटलं जातं, या प्रजातीचे होते. सलग तीन दिवस या घरातून साप बाहेर पडत होते. या सापांची दहशत एवढी की हे कुटुंब भीतीमुळे तीन दिवस घरात झोपू सुद्धा शकलं नाही. हळुहळु ही बातमी संपूर्ण गावात पसरली. सलग तीन दिवस घरातून सारखे साप बाहेर पडतच असल्यामुळे संपूर्ण गावात देखील भीतीचं वातावरण पसरलं. शेवटी सर्पमित्रांच्या मदतीने यातील तीस सापांना पकडून जंगलामध्ये रेस्क्यू करण्यात आलं. मात्र तीन दिवसांमध्ये तीस साप जंगलात सोडून देखील या घरातून साप बाहेर पडतच होते, अखेर या कुटुंबाने शेवटी आपलं घर खोदण्याचा निर्णय घेतला. ही घटना उत्तर प्रदेशातल्या बागपत जिल्ह्यातल्या कहरका गावात घडली आहे.
जेव्हा या कुटुंबाने ग्रामस्थांच्या मदतीने आपलं घर खोदलं तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्यांना प्रचंड धक्का बसला, अनेकांना तर घामच फुटला. तिथे जमिनीखाली एक नाही दोन नाही तर सापांचे तब्बल 100 पेक्षा अधिक अंडे होते. त्यातूनच एक -एक साप बाहेर पडत होता. त्यानंतर या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाने सापांचे हे अंडे ताब्यात घेतले आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना कहरका गावचे ग्रामस्थ असलेल्या कपिल त्यागी यांनी सांगितलं की आमच्या घरात गेल्या आठ वर्षांपासून अशा प्रकारे साप आढळून येत आहेत. सुरुवातीला कधी-कधी साप दिसून यायचे. आम्ही त्या सापांना पकडून घराबाहेर सोडून द्यायचो. मात्र ही एक सामान्य घटना आहे, असं समजून आम्ही त्याकडे दुर्लक्ष करायचो. परंतु गेल्या आठवडाभरात आमच्या घरात सतत साप निघत आहेत. तीन दिवसांमध्ये तब्बल तीस पेक्षा अधिक साप आढळून आले आहेत. घराच्या वेगवेगळ्या भागात साप दिसत असल्यामुळे कुटुंबामध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मात्र आम्ही जेव्हा आमचं संपूर्ण घर खोदलं तेव्हा तिथे आम्हाला सापांचे शंभारपेक्षा अधिक अंडे आढळून आले आहेत. त्याची माहिती वनविभागाला देण्यात आली, माहिती मिळताच वनविभागाने हे अंडे ताब्यात घेतले आहेत. या घटनेमुळे आम्ही सलग तीन दिवस नीट झोपू सुद्धा शकलो नाहीत, असंही यावेळी कपिल यांनी सांगितलं.
