भारतात उद्यापासून iPhone 18 Pro च्या विक्रिला सुरूवात, या ठिकाणी मिळणार सर्वात स्वस्त डिल, तुमचे पैसे किती वाचणार?
iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max च्या विक्रीला १८ सप्टेंबरपासून भारतात सुरुवात होणार आहे. नवीन iPhone खरेदीवर बँक कॅशबॅक, एक्सचेंज ऑफर आणि EMIचा पर्याय मिळण्याची शक्यता आहे. कुठे मिळणार स्वस्त डील आणि खरेदी करताना किती पैशांची बचत होऊ शकते, जाणून घ्या सविस्तर.

बाजारात नुकताच iPhone 18 Pro लाँच झाला आहे. हा iPhone 18 Pro खरेदी करण्यासाठी तरूणाई आसूसलेली आहे. लाँच झालाय पण बाजारात केव्हा येणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे. पण आता ती वेळ जवळ आली आहे. अॅपलने लाँच केलेल्या नवीन iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro MAX याचा सेल लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यावर किती ऑफर्स मिळणार, स्वस्त डिल कुठे मिळणार याबद्दल जाणून घ्या सविस्तर
iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro MAX याचा सेल उद्यापासून म्हणजेच १८ सप्टेंबर २०२६ पासून सुरू करण्यात येणार आहे. iPhone 18 Pro ची सुरूवातीची किमत १,६४,९०० इतकी आहे. त्यात 256GB स्टोरेज उपलब्ध असणार आहे. तर प्रत्येक वेरिंएटनुसार याच्या किमतीत बदल असणार आहे. 512GB वेरिएंटची किंमत १,८९,९०० रूपये, 1TB मॉडलची किंमत २,३९,९०० तर 2TB वेरिएंटची किंमत ३,१४,९०० रुपये इतकी आहे.
त्यातच iPhone 18 Pro MAX ची सुरूवात १,७९,९०० रुपयांपासून आहे. त्यात 256GB उपलब्ध असणार आहे. 512GB वेरिएंट २,०४,९०० रूपये , 1TB मॉडल २,५४, ९०० रूपये आणि 2TB वेरिएंट ३,२९,९०० रुपये इतकी आहे.
iPhone 18 Pro ची सर्वात स्वस्त डिल कुठे मिळणार
iPhone 18 Pro खरेदी करताना काही बँक्सच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ७००० पर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. त्यासोबतच APPLE च्या काही बेवसाईटवर AMERICAN EXPRESS, AXIX BANK आणि ICICI BANK यांच्या कार्डवर ऑफर मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय FLIPCART, AMAZON, RELIANCE DIGITAL, VIJAY SALES आणि CROMA यांसारख्या ऑनलाईन सेवांवर किंवा वेबसाईटवर विशेष डिस्काऊंट देखील मिळण्याची शक्यता आहे.
जुन्या फोनवर इतके ऑन मिळणार
जर तुमचा जुना फोन किंवा जुना आयफोन एक्सचेंज करून फोन खरेदी करणार असाल तर त्यावरही तुम्हाला भरगोस सूट मिळण्याची शक्यता आहे. तुमचा फोन चांगल्या कंडिशनमध्ये असेल तर मिळालेल्या माहितीनुसार ANDROID ते जुन्या iPhone ची किमत ४,५०० ते ८१, ५०० पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
iPhone 18 Pro खरेदी करताना EMI चा ऑप्शन
iPhone 18 Pro खरेदी करताना जर तुम्हाला एकदम पैसे भरणे शक्य नसेल तर EMI चा ऑप्शन देखील उपलब्ध आहे. iPhone 18 Pro 256GB साठी २६,३१६पर्यंत प्रति महिना EMI भरता येणार आहे तर iPhone 18 Pro MAX साठी २८,८१७ पर्यंत EMI उपलब्ध असणार आहे.
