दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
महाराष्ट्रातील दुष्काळी स्थितीवरून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय संघर्ष पेटला आहे. फडणवीसांनी मराठवाड्यात शेतकऱ्यांसाठी घोषणा केल्या, तर ठाकरेंनी तुमसे ना हो पाएगा आंदोलन करत ५ ऑक्टोबरनंतरच्या पंचनाम्यांच्या घोषणेवर टीका केली. या मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
महाराष्ट्रातील दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात तीव्र राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथे फडणवीसांनी शेतकऱ्यांना दुष्काळात मदत करण्याची आणि ५ ऑक्टोबरनंतर पंचनामे करण्याची घोषणा केली. सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे, उद्धव ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगर येथेच तुमसे ना हो पाएगा हे आंदोलन करत सरकारच्या भूमिकेवर टीका केली.
शेतकरी पंचांग बघून आत्महत्या करत नाही, असे म्हणत त्यांनी ५ ऑक्टोबरच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, स्वतः आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते राज्यभर फिरून पंचनाम्यांवर लक्ष ठेवतील असेही ते म्हणाले. फडणवीसांनी ठाकरेंच्या आंदोलनाला नाकर्त्यांचं आंदोलन म्हटले, तर ठाकरेंनी पंचनाम्यातील विलंब हा आपला नाकर्तेपणा नसल्याचे स्पष्ट केले. दुष्काळाच्या संकटात दोन्ही नेत्यांमधील ही जुगलबंदी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.
Published on: Sep 17, 2026 07:21 PM
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...

