शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट…
शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी संपली आहे. पुढील सुनावणी मंगळवारी किंवा बुधवारी होणार आहे. न्यायमूर्ती बागची यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. केवळ विधिमंडळ सदस्य संख्येवर निर्णय कसा घेतला, पक्षचिन्ह गोठवणे हा पर्याय होता का, असे महत्त्वाचे प्रश्न कोर्टाने विचारले.
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवार किंवा बुधवारी होणार आहे. शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी आजच्या युक्तिवादात सुभाष देसाई, सादिक अली आणि अर्जुन सिंग या प्रकरणांचे दाखले दिले. मात्र, सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती बागची यांनी नीरज किशन कौल यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केल्याचे दिसून आले. न्यायमूर्ती बागची यांनी स्पष्टपणे म्हटले की, निवडणूक आयोगाला त्यांचे स्वतंत्र अधिकार आहेत हे आम्ही नाकारत नाही, परंतु आयोगाने घेतलेला निर्णय योग्य आहे की नाही, हे तपासण्याचा अधिकार न्यायालयाला आहे.
केवळ विधिमंडळ पक्षाच्या संख्येच्या आधारावर हा निर्णय कसा घेण्यात आला, तसेच पक्षचिन्ह गोठवून दोन्ही गटांना वेगळे चिन्ह देऊन पुढे जाण्यास सांगितले जाऊ शकले असते का, असा महत्त्वाचा प्रश्न न्यायमूर्ती बागची यांनी उपस्थित केला. केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकार वेगळे आहेत या शिंदे गटाच्या युक्तिवादावर कोर्टाने ही महत्त्वाची टिप्पणी केली आहे.
Published on: Sep 17, 2026 05:20 PM
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष...
शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटी..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..

