ब्राह्मण समाज नेमका कुठे चुकतोय? प्रशांत किशोर यांनी समजावलं ब्राह्मण, मुस्लिम मतांचं गणित, व्हिडीओ व्हायरल
जनसुराज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते ब्राह्मण आणि मुस्लिम मतांचं समीकरण समजावून सांगत आहेत. त्यांनी आपल्या व्हिडीओमध्ये काही प्रश्न देखील उपस्थित केले आहेत.

जनसुराज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते ब्राह्मण आणि मुस्लिम मतांचं समीकरण समजावून सांगत आहेत. ते ब्राह्मण समाजाला उद्देशून म्हणत आहेत की तुमचे पूर्वज काँग्रेसच्या काळात आमदार, खासदार होते. लोकशाहीमध्ये तुम्हाला कोणाकडून किती टक्के मतदान होऊ शकतं? यालाच महत्त्व असतं. सरस्वतीने तुमची साथ कशी सोडली? हे मी उदाहरण देऊन सांगतो. तुम्हाला हे चांगलंच माहिती आहे की, निवडणूक जिंकायची असेल तर मतदान झालं पाहिजे. आता तुम्ही तुमची लोकसंख्या तर वाढू शकत नाहीत. दुसरी गोष्ट होती ती म्हणजे वीस टक्के मतदान हे मुस्लिमांचं होतं. मात्र असं असताना देखील तुम्ही भाजपचा झेंडा हाती घेतला. तुम्ही सोशल मीडियावरून मुस्लिम समाजाला शिव्या देऊ लागतात. त्यामुळे तुम्हाला जे वीस टक्के मतदान होण्याची शक्यता होती, ते देखील तुमच्या हातून गेलं, मग आता सांगा अशा स्थितीमध्ये तुम्ही निवडणूक कशी जिंकू शकता? असं या व्हिडीओमध्ये प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.
मुस्लिमांसोबत कोणत्या गोष्टींची लढाई?
आपलया या व्हिडीओमध्ये बोलताना पुढे प्रशांत किशोर यांनी असं देखील म्हटलं की, तुमची मुस्लिमांसोबत अशी कोणत्या गोष्टींची लाढाई आहे? जमिनीची लढाई आहे? आरक्षणाची लढाई आहे? यापैकी नक्की कशाची लढाई आहे? तुम्ही कधी दंगलीमध्ये गेला नाहीत, तुम्ही कधी मुंगी सुद्धा मारू शकत नाहीत. परंतु फेसबुकवर जाऊन भाजपचा झेंडा हाती घेतला. मुस्लीम समाजाला शिव्या देऊ लागलात, याचा परिणाम काय झाला तर ज्यांच्या मतदानावर तुम्ही राजा बनत होतात, तेच मतदार तुमच्यापासून दुरावले गेले, आणि तुम्ही अजूनही स्वत:ला बुद्धिजीवी समजतात, हे असं कोणतं ज्ञान आहे.
तुमची ताकद लेखणी आहे
प्रशांत किशोर यांनी या व्हिडीओमध्ये असंही म्हटलं आहे की, सध्या तुम्हाला परशुरामांचं उदाहरण दिलं जात आहे. परंतु तुम्ही चुकीच्या रस्त्याने चालला आहात, तुमची खरी ताकद लेखणी आहे. तुमची खरी ताकद माता सरस्वती आहे, असं यावेळी प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. सध्या तुमची स्थिती अशी झाली आहे की, तुम्हालाच भगवान परशुराम यांची जंयती साजरी करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.