Esha Deol : घटस्फोट नक्की झालाय की नाही? पूर्व पतीसोबत ईशा देओल, ‘तो’ व्हिडीओ समोर येताच चर्चांना उधाण
Esha Deol : अभिनेत्री ईशा देओल हिचा पूर्व पती भरत तख्तानी याच्यासोबत एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दोघे पारंपरिक लूकमध्ये दिसले. घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर ईशा आणि भरत एकत्र दिसल्याने सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

Esha Deol : दिवंगत अभिनेते धर्मेंद्र आणि दिग्गज अभिनेत्री हेमा यांची लेक ईशा देओल गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच ईशा हिने भरत तख्तानी यांच्यासोबत घटस्फोट झाल्याची घोषणा केले. पण नुकताच झालेल्या एका दिवाळी पार्टीमध्ये ईशा आणि भरत यांनी एकत्र स्पॉट करण्यात आलं. दोघे फक्त एकत्र दिसले नाहीत, पापाराझींना पोज देताना देखील दिसले. याच कारणामुळे पुन्हा दोघांच्या नात्याची चर्चा सुरु झाली आहे. दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर, घटस्फोट झाल्याच्या 2 वर्षांनंतर ईशा आणि भरत एकत्र दिसल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
दिवाळी पार्टीत दिसले एकत्र…
ईशा देओल शनिवार संध्याकाळी एका दिवाळी पार्टीला पोहोचली तेव्हा तिच्यासोबत भरत तख्तानी देखील उपस्थित होता. दोघांनी पापाराजींसमोर एकत्र उभे राहून फोटो देखील काढले. व्हिडिओमध्ये दोघेही हसत कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहेत. ईशाने बेबी पिंक रंगाची शिमरी साडी नेसली होती, ज्यावर पांढऱ्या रंगाच्या भरतकामाची सुंदर बॉर्डर दिसत होती. तर भरत क्रीम रंगाच्या बंदगळ्याच्या एथनिक लूकमध्ये दिसून आला.
View this post on Instagram
सध्या दोघांचा व्हिडीओ व्हायरल होत असून नेकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. अनेकांना दोघांना एकत्र पाहून आनंद झाला तर, अनेकांनी ‘दोघांचा नक्की घटस्फोट झाला आहे की नाही?’ असा प्रश्न देखील उपस्थित केला. दोघांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी जून 2012 मध्ये लग्न केलं होतं. दोघांचं लग्न मुंबईतील इस्कॉन मंदिरात दाक्षिणात्य पद्धतीनुसार पार पडलेलं
लग्नानंतर जवळपास 5 वर्षांनी, 2017 मध्ये ते आई-वडील झाले. आई – वडील झाल्यानंतर देखील दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना, ईशा आणि भरत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विभक्त होत असल्याचा खुलासा केला. पण मुलींचा सांभाळ दोघेही जबाबदार आई – वडील म्हणून करत आहेत.
घटस्फोटानंतर ईशा हिने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. अभिनेत्रीने पुन्हा अभिनय विश्वात पदार्पण केलं आहे. सोशल मीडियावर देखील ईशा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
