AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : भारतासाठी खड्डा खोदला पण त्यात स्वत:च पडले, प्रसिद्ध क्रिकेट एक्सपर्टच न्यूझीलंडच्या अवस्थेबद्दल अचूक विश्लेषण

IND vs NZ : टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यात जबरदस्त प्रदर्शन करतेय. खरंतर टीम इंडियाची सध्याची कामगिरी पाहता ते असं प्रदर्शन करतील असं कोणाला वाटलं नव्हतं. पण टीम इंडियाने सगळ्यांनाच अवाक केलय.

IND vs NZ : भारतासाठी खड्डा खोदला पण त्यात स्वत:च पडले, प्रसिद्ध क्रिकेट एक्सपर्टच न्यूझीलंडच्या अवस्थेबद्दल अचूक विश्लेषण
IND vs NZ
| Updated on: Nov 08, 2026 | 2:58 PM
Share

टीम इंडियाने शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली दुसरा वनडे सामना जिंकला आहे. न्यूझीलंड विरुद्ध पाच वनडे सामन्याच्या सीरीजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी यजमान न्यूझीलंडची हालत खराब केली. पहिल्या वनडेमध्ये न्यूझीलंडचा डाव 185 धावांवर आटोपला होता. दुसऱ्या वनडे मध्ये न्यूझीलंड टीमला फक्त 134 धावांपर्यंतच पोहोचता आलं. भारताच्या वेगवान गोलंदाजांचं कौतुक होतय. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि एक्सपर्ट अतुल वासन यांनी न्यूझीलंड टीमला वॉर्निंग दिली आहे. किवी टीमने वेगवान गोलंदाजांना मदत करणारं पीच बनवून भारतासाठी खड्डा खोदला. पण आता ते स्वत:च त्या खड्ड्यात पडले आहेत. भारतीय गोलंदाज या वातावरणात न्यूझीलंडच्या गोलंदाजांपेक्षा सरस कामगिरी करतायत. त्यांनी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला क्रिकेटची क्वालिटी खराब केल्याबद्दल वॉर्निंगही दिली आहे.

“त्यांचं धोरण साफ आहे, न्यूझीलंड असेच पीचेस देणार. पण त्यांनी एक खड्डा खोदलाय त्यात आता तेच पडलेत. इंडियन बॉलर्स या स्थितीचा फायदा उचलतायत. पेस आणि बाऊन्स भारतीय बॉलर्समध्ये आता तो एक्स फॅक्टर आलाय. आधी आम्ही परदेशात जायचो, तेव्हा टीम्स कदाचितच या स्थितीचा फायदा उचलायच्या. पण आता भारतीय स्क्वाडमध्ये असे प्लेयर्स आहेत, जे बाजी पलटू शकतात आणि तेच घडतय” असं अतुल वासन ANI शी बोलताना म्हणाले.

क्रिकेटच्या दर्जावर परिणाम होतो

भारताचा विजय जितका ठाम असायला पाहिजे होता, तितका तो नव्हता असं सुद्धा वासन म्हणाले. त्यांनी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला आपल्या पीच स्ट्रॅटजीवर पुन्हा फेरविचार करण्याचा सल्ला दिला. काही खास कंडीशन्समध्ये जास्त फेवर केल्याने क्रिकेटच्या दर्जावर परिणाम होतो असं सुद्धा ते म्हणाले. 2027 साली दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या वनडे वर्ल्ड कप वेळी परिस्थिती वेगळी असेल हे सुद्धा त्यांनी सांगितलं.

आता वनडे मध्ये सुद्धा वाईट पद्धतीने हरताय

“आज भारत जिंकला पण काही कमतरता होत्या. भारत सहज चांगला विजय मिळवू शकला असता. पण विकेट अशी होती. तुम्ही टी20 सीरीज हरला आहात. आता वनडे मध्ये सुद्धा वाईट पद्धतीने हरताय. आपण वर्ल्ड कप साठी जाऊ तेव्हा परिस्थिती थोडी वेगळी असेल. म्हणून मी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला विनंती करेन की, परिस्थिती इतकी बदलू नये की क्रिकेटच्या क्वालिटीवर परिणाम होईल” असं अतुल वासन म्हणाले.

Follow Us
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत,
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास तीच खरी दिवाळी! शिंदे गटातील नेत्याच...
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास तीच खरी दिवाळी! शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
भव्य रांगोळी, झगमग रोषणाई... दिवाळी पहाटचा उत्साह; पहा सुंदर व्हिडीओ..
Diwali 2026 : भव्य रांगोळी, झगमग रोषणाई... दिवाळी पहाटचा उत्साह; पहा सुंदर व्हिडीओ...