Abhijeet Dipke News : कुठे आहेत CJP चे संस्थापक अभिजीत दिपके, कशी आहे प्रकृती ? मोठी अपडेट समोर

Abhijeet Dipke News : कॉकरोच जनता पक्षाने देशव्यापी आंदोलन पुकारलं आहे. राजधानी दिल्लीपासून ते पाटणा. जयपूर, भोपाळ, मुंबईसह अनेक शहरांत आंदोलकांची, विद्यार्थ्यांची एकजूट पहायला मिळत आहे. आंदोलनकांना हटवण्यासाठी पोलिसांना बळाचाही वापर करावा लागला होता. या सर्वांदरम्यान सीजेपीचे संसंथ्पाक अभिजीत दिपके कुठे आहेत , असा प्रश्न सध्या सर्वांच्या मनात असून मोठी अपडेट समोर आली आहे.

Abhijeet Dipke News : कुठे आहेत CJP चे संस्थापक अभिजीत दिपके, कशी आहे प्रकृती ? मोठी अपडेट समोर
अभिजीतदिपके यांची प्रकृती कशी ?
| Updated on: Jul 24, 2026 | 12:29 PM

Abhijeet Dipke News : राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे गेल्या महिन्याभरापासून कॉकरोच जनता पक्ष आणि विद्यार्थ्यांचे सुरू असलेले आंदोलन आता आणखी तीव्र झाले असून CJPने आज ( 24 ) देशव्यापी निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यासाठी देशभरातील अनेक शहरात निदर्शनं करण्यात येत आहेत.या आवाहनाला प्रतिसाद देत दिल्लीसह पाटणा, जयपूर, भोपाळ, कोलकाता अशा अनेक शहरांमध्ये विद्यार्थी आणि तरुण रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे या आंदोलनाचा देशभरात मोठा प्रभाव दिसून येत आहे. तर दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतर येथे CJP च्या नेतृत्वाखाली सुरू असलेले विद्यार्थी आणि युवा आंदोलन अद्याप कायम आहे. सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतरही हे आंदोलन अद्याप सुरूच असून आंदोलक त्यांच्या भूमिकेवर आणि मागण्यांवर ठाम आहेत.

मात्र या सर्व पार्श्वभूमीवर CJP चे संस्थापक आणि प्रमुख अभिजीत दिपके कुठे आहेत, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे. काल त्यांची तब्येत ठीक नसल्याते, त्यांना ताप आल्याचे वृत्त समोर आले होते, त्यामुळे त्यांनी थोडा काळा ब्रेक घेतला होता. मात्र आता त्यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. खुद्द दिपके यांनी स्वतःच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत आपल्या प्रकृतीबाबत आणि ते कुठे आहे, त्या ठिकाणाबाबत माहिती दिली आहे.

काय म्हणाले दिपके ?

प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे मला रुग्णालयात उपचार घ्यावे लागले, मात्र, आता मी पुन्हा जंतर-मंतरकडे परत जात आहे, असं अभिजीत दिपके यांनी सांगितलं. “एक रात्र IV, उपचार, इंजेक्शन आणि अनेक रक्त तपासण्यांमध्ये गेल्यानंतर मी पुन्हा जंतर-मंतरकडे जात आहे. तापामुळे अजूनही शरीरात अशक्तपणा जाणवत आहे, पण हा संघर्ष सुरूच राहील. धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आमचे शांततापूर्ण आंदोलन सुरू राहणार आहे.” असं दिपके यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे. NEET पेपर लीक प्रकरणावरून अभिजीत दिपके आणि CJP कडून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

 

CJP कडून देशव्यापी आंदोलनाची हाक

दरम्यान, NEET पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ CJP चे जंतर-मंतरवरील आंदोलन सुरू आहे. शिक्षण व्यवस्थेत मोठ्या सुधारणा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी संघटनेकडून करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपर लीक प्रकरणांवर कठोर कारवाईसाठी नवीन कायदा आणण्याच्या घोषणेचे CJP ने स्वागत केलं. मात्र, परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकार रोखण्यासाठी सर्वात मोठे पाऊल म्हणजे शिक्षण मंत्र्यांना पदावरून हटवणे आवश्यक असल्याचे संघटनेचे म्हणणं आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत जंतर-मंतरवरील शांततापूर्ण आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार CJP ने व्यक्त केला आहे.

सोनम वांगचुक यांनी संपवले उपोषण

सरकारकडून मागण्यांवर सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले अनिश्चितकालीन उपोषण समाप्त केलं. गुरुवारी रात्री गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्याशी झालेल्या भेटीनंतर त्यांनी उपोषण संपवण्याचा निर्णय जाहीर केला. सरकार त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक पावले उचलेल, असे आश्वासन दोन्ही मंत्र्यांनी दिल्याचे वांगचुक यांनी सांगितले. सरकारच्या आश्वासनाचा आदर करत आपण उपोषण मागे घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, पुढील घडामोडींवर लक्ष ठेवणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us