जगातील सर्वात लांब साप, सर्वाधिक वर्षे जीवन जगतो; विषारी आहे की नाही, नाव काय?

सापांचं जग हे मानवी जीवनासाठी अत्यंत गूढ आणि कुतूहल निर्माण करणारं आहे. सापांबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. आज आपण जगातील सर्वात लांब आणि सर्वाधिक वर्षे जगणाऱ्या सापाबद्दल माहिती जाणून घेऊयात...

जगातील सर्वात लांब साप, सर्वाधिक वर्षे जीवन जगतो; विषारी आहे की नाही, नाव काय?
how long do snakes live
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 27, 2026 | 7:06 PM

सापांबद्दल भारतीय समाजामध्ये कायम कुतूहल राहिलं आहे. भारतामध्ये सापांना देवतेचं रुप मानलं जातं. सापांच्या अनेक प्रजाती आहेत. अनेकदा कोणता साप विषारी, कोणता बिनविषारी हे ओळखणंही अनेकांना कठीण होऊन जातं. भारतात आणि भारताबाहेरही साप या प्रजातीविषयी विविध माहिती उपलब्ध आहे. भारतामध्ये महादेव या देवाशी असलेलं सापाचं नातं सर्वदूर प्रसिद्ध आहे. तर जगातल्या इतर देशांमध्ये त्याच्याबद्दल इतर अनेक कथा रचलेल्या मिळतात. अनेकदा साप आणि त्यांच्या अधिवासाबद्दल माणसाला जाणून घ्यायला आवडतं. पण साप आपल्या घरात किंवा परिसरात आढळून आला की मात्र प्रत्येकाची धांदल उडते. सोशल मीडियामुळे अनेक सर्पमित्र विविध सापांबद्दलची त्यांना ज्ञात असलेली माहिती शेअर करत असतात. यावेळी ते सापांना रेस्क्यू करतात आणि नैसर्गिक अधिवासामध्ये त्याला सोडून देतात.

दरम्यान, सापांच्या जीवनाच्या आयुबद्दल बोलायचं झालं तर ते सापांच्या प्रजातीनुसार बदलते. त्यामुळे काही साप हे अनेक वर्ष जगू शकतात. याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? जगात असे अनेक साप आहेत, जे काहीच महिने, तर काही काही वर्ष जगतात. तर मोजके काही आहेत, जे वर्षानुवर्षे जगतात. हे आयुष्य साधारण एखाद्या व्यक्तीच्या जीवनाच्या आयुर्मानासारखेही मानता येऊ शकते.

Loading...

जगातला सर्वात लांब आणि सर्वाधिक वर्षे जगणारा साप कोणता?

त्यामुळे सापाचे आयुष्य ठरवण्यात त्याची प्रजाती, त्यांता आहार आणि अनुवंशिक घटक या सर्व गोष्टी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. जगातल्या सर्वाधिक आयुष्य जगणाऱ्या सापाबद्दल बोलायचं झाल्यास हा साप सर्वात लांब साप आहे आणि तो जवळपास तब्बल 40 वर्ष जीवन जगतो. या सापाचं नाव ‘बोआ कॉन्स्ट्रिक्टर’ आहे. हा आकारानेही प्रचंड मोठा असतो. उपलब्ध अहवालांनुसार या सापाचे आयुष्य तो जर नैसर्गिक आणि पोषक अधिवासात असेल तर 40 वर्षांपर्यंत जगू शकतो. साप दक्षिण आफ्रिकेत आढळतो विशेष म्हणजे हा साप बिनविषारी असतो.

बोआ कॉन्स्ट्रिक्टर हा साप जगातील मोठ्या आणि लांब सापांच्या प्रजातींपैकी एक असून त्याखालोखाल कोब्रा ही प्रसिद्ध विषारी सापांची प्रजाती आहे. जीचे आयुष्य साधारणपणे 25 ते 30 वर्षांपर्यंत असू शकते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us