कोट्यवधींचे बक्षीस, 45 वर्षांपासून सक्रीय, 200 पेक्षा जास्त नक्षली कारवाया, सुरक्षा दलाच्या कारवाईत ठार झालेला टॉप नक्सली बसव राजू कोण?

Basava Raju: अनेक नक्षलवादी हल्ल्यांचा आरोपी बसव राजू याच्यावर कोट्यवधींचे बक्षीस आहे. तो महाराष्ट्रासह छत्तीसगड, उडीसा, तेलंगाना राज्यात अनेक चकमक व आयडी ब्लास्ट प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. ४५ वर्षांपासून तो नक्षली सक्रीय आहे.

कोट्यवधींचे बक्षीस, 45 वर्षांपासून सक्रीय, 200 पेक्षा जास्त नक्षली कारवाया, सुरक्षा दलाच्या कारवाईत ठार झालेला टॉप नक्सली बसव राजू कोण?
basava raju
| Updated on: May 22, 2025 | 11:25 AM

गडचिरोली जिल्ह्याचा सीमेपासून २५ किलोमीटर असलेल्या अबुझमाड जंगलात सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले. बुधवारी या ठिकाणी २७ नक्षलींचा खात्मा करण्यात आला. त्यात एक कोटी पेक्षा जास्त रक्कमेचे बक्षीस असलेला नक्षली चळवळीचा नेता अंबाला केशवराव उर्फ बसवा राजू याचाही समावेश आहे. सीपीआई (माओवादी) महासचिव असलेला बसव राजू मागील ४५ वर्षांपासून नक्षली चळवळीत होता. २०० पेक्षा जास्त नक्षलवादी कारवायांमध्ये तो सहभागी होता. गडचिरोली छत्तीसगडच्या हल्ल्यात बसवा राजूच्या मृत्यूमुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. मोदी सरकारने ३१ मार्च २०२६ पूर्वी नक्षलवाद संपवण्याचा संकल्प केला आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली होती.

कोण आहे बसवा राजू?

बसवा राजू हा गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीसगड, उडीसा, तेलंगाना राज्यात अनेक चकमक व आयडी ब्लास्ट प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. तो आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील जियान्नापेट येथील रहिवासी आहे. वरंगलच्या राष्ट्रीय अभियांत्रिक महाविद्यालयातून त्याने बीटेक पूर्ण केले. शिक्षणाच्या वेळेस तो विद्यार्थ्यांच्या नेता होता. नंतर नक्षलच्या नेता बनला. 1987 मध्ये नक्षल चळवळीत सक्रिय नक्षलवादी म्हणून बसवा राजूने आपली ओळख निर्माण केली होती. 1992 मध्ये माओवादी संघटनच्या केंद्रीय समितीच्या सदस्य पदी त्याची निवड करण्यात आली.

2004 मध्ये सीपीआय माओवादी संघटनेच्या लष्करी आयोगाच्या प्रमुख म्हणून सर्वोच्च पदावर बसवा राजू होता. त्याने माओवादी संघटनेमध्ये मानधन सुरू करून 20,000 युवकांना माओवादी चळवळीत सहभागी करून घेतले. गेल्या दोन वर्षांत मोठ्या नेत्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामुळे बसवा राजूकडे पाच राज्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्याचे प्रकाश, कृष्णा, विजय, उमेश आणि कमलू असे अनेक नावे आहेत.

कोट्यवधींचे होते बक्षीस

अनेक नक्षलवादी हल्ल्यांचा आरोपी बसव राजू अनेक राज्यांमध्ये हवा होता. छत्तीसगडमध्ये त्याच्यावर १ कोटी रुपयांचे बक्षीस होते. याशिवाय आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि तेलंगणासह इतर राज्यांच्या सरकारनेही त्याच्यावर बक्षीस जाहीर केले होते.