Delhi Crime : मुंबई किंवा बंगळूरूपेक्षा दिल्ली महिलांसाठी असुरक्षित का? काय आहेत नेमकी कारणं

NCRBच्या 2024च्या आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये महिलांविरोधातील 13,396 गुन्हे नोंदवले गेले. 19 मोठ्या महानगरांमध्ये हा सर्वाधिक आकडा असून मुंबईमध्ये 6,358 आणि बंगळुरूमध्ये 4,748 प्रकरणे नोंदवली गेली.

Delhi Crime : मुंबई किंवा बंगळूरूपेक्षा दिल्ली महिलांसाठी असुरक्षित का? काय आहेत नेमकी कारणं
delhi crime
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 23, 2026 | 8:54 PM

दिल्ली म्हटली की देशाची राजधानी, मोठमोठ्या इमारती, गल्ली बोळा, मोहल्ला , मेट्रो आणि सतत धावणारं शहर. पण याच शहरात महिलेच्या सुरक्षेच्या प्रश्न न कायमचा लटकलेला. मुंबई आणि बँगळूरूसारख्या मोठ्या शहरांच्या तुलनेत दिल्लीत महिलांविरोधातील गुन्ह्यांची नोंद अधिक असल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. 2024 मध्ये दिल्लीत महिलांविरोधातील 13,396 गुन्हे नोंदवले गेले होते. त्यामुळे राजधानीत महिलांविरोधातील गुन्हे जास्त का नोंदवले जातात. यामागे जरा नजर टाकूया

रात्रीचे रस्ते आणि अंधाराचा प्रश्न

दिल्लीत आजही काही भाग असे आहेत, जिथे रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाईट्स नसतात. रस्ते मोहल्ले पार काळोखात गेलेले असतात. मुंबई कधीच झोपत नाही त्यामुळे रात्री ते अगदी पहाटेपर्यंत मुंबईकर प्रवास करत असतात. त्यातुलनेत दिल्ली लवकर झोपी जाते. त्यामुळे रस्ते, बसस्थानक, सब – वे किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या वेळी सामसुम असतात. दिल्लीच मेट्रो स्टेशन जरी भलंमोठ असल तरी रात्रीच्या वेळी तेही सामसुम होतं. त्यामुळे घरापर्यंत जाताना महिलेला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.

मोठी लोकसंख्या हेही एक कारण

दिल्लीची मोठी लोकसंख्या आणि वेगवेगळ्या भागांतून रोजगारासाठी येणाऱ्या लोकांची संख्या हा देखील या चर्चेतील एक मुद्दा आहे. मोठ्या शहरांमध्ये लोकसंख्या अधिक असल्यामुळे सोईसुविधा अपुऱ्या पडतात. त्यामुळे गुन्हे सर्रासपणे घडतात आणि गुन्हेगारांना लपण्यासाठी अशी गर्दीची ठिकाण सोईस्कर असतात. दिल्लीला हरियाणा आणि उत्तर प्रदेश यांची सीमा लागून असल्याने गुन्हेगारांना पळून जाणे सहज शक्य होते.

महिलांविरोधात अनेक गुन्ह्यांमध्ये ओळखीचे लोक

महिलांच्या सुरक्षेबाबत चर्चा करताना केवळ अनोळखी गुन्हेगारच नसतात. तर बहुतेकसे गुन्हेगार हे महिलांचे नातलगच असतात. दिल्लीत महिलांविरोधातील सुमारे ९० टक्के गुन्ह्यांमध्ये आरोपी हा पिडीत महिलेचा नातेवाईक किंवा परिचित असतो.

पुरुषप्रधान मानसिकता

दिल्लीतील काही भागामध्ये अजूनही पुरूषप्रधान मानसिकता आणि महिलांबाबतच्या सामाजिक दृष्टिकोनाचा परिणामही दिसतो. अशाच वातवरणात बऱ्याच महिला घरगुती हिंसा आणि अत्याचाराला अगदी सहजपणे केला जातो. त्यामुळे महिलांवरील अत्याचार वाढण्यात पुरूषप्रधान मानसिकतेचाही दोष आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us