
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे देशभरातील सध्या चर्चेत आहेत. जिकडे तिकडे त्यांची चर्चा असते. ते हिंदूंना एकत्र आणण्याचे आवाहन करत असताना त्यांचे धाकटे बंधू शालिग्राम गर्ग यांनी मात्र बागेश्वर धाम महाराज यांच्याशी आयुष्यभराचे सर्व संबंध तोडले आहेत. शालिग्राम गर्ग याने त्याचा व्हिडीओ बनवून आपल्या फेसबुकवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो धीरेंद्र कृष्ण शास्त्रीसोबतचे नाते तोडल्याची माहिती देत आहे.
व्हिडीओमध्ये शालिग्राम गर्ग म्हणत आहे की, आमच्यामुळे बागेश्वर धाम आणि महाराज जी आणि सनातन हिंदूंची प्रतिमा मलीन झालीये. आज आम्ही यामुळे बालाजी सरकार आणि पूज्य महाराज यांची माफी मागतो. आमचा किंवा आमच्या कोणत्याही विषयाचा बागेश्वर धाम आणि बागेश्वर धामचे महाराज यांच्याशी संबंध जोडू नये.
शालिग्राम गर्ग पुढे म्हणाला की, आजपासूनच आम्ही बागेश्वर धाम महाराज यांच्याशी सर्व कौटुंबिक संबंध तोडले आहेत. आता आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही. जिल्हा कौटुंबिक न्यायालयालाही आम्ही लेखी स्वरूपात ही माहिती दिली आहे. फेसबूकवर ही रील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. https://www.facebook.com/reel/1639402146666464
बागेश्वर धाम महाराजांचे धाकटे बंधू शालिग्राम गर्ग अनेकदा वादात राहतात. यासाठी त्यांनी पोलीस ठाणे आणि न्यायालयाच्या चकरा मारल्या आहेत.