
मुंबईत 8 जुलै रोजी मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली त्यामुळे मुंबई जलमय झाली. त्यानंतर हवामान विभागाने 9 जुलै रोजी देखील असाच पाऊस येण्याचा अंदाज वर्तविला, त्यामुळे प्रशासनाने शाळांना सुटी जाहीर केली. परंतू प्रत्यक्षात चक्क ऊन पडले. त्यामुळे शाळेतील मुलांना सुटीचा आनंद घेता आला असला तरी हवामान विभागाचा अंदाज पुन्हा चुकीचा ठरल्याने हवामान खाते विनोदाचा विषय ठरले आहे. भारतीय हवामान खात्याचे अंदाज वारंवार का चुकतात ? हवामान शास्र पुरेसे विकसित झालेले नाही का ? नेमके हे का होत आहे. IMD चा पावसाचा अंदाज अजूनही का चुकतो ? आपली यंत्रणा अजूनही चाचपडतेय का ? या विषयाचा घेतलेला हा धांडोळा…. जगात सर्वत्र दोन ऋतू आहेत, उन्हाळा आणि हिवाळा. परंतू आपल्या येथे एक ‘एस्क्ट्रा’ ऋतू आहे तो म्हणजे पावसाळा. या पावसाळ्यावर भारताला शेती प्रधान देश म्हटले जाते. त्यामुळे हवामानाचा अंदाज वर्तविण्याचे प्रयत्न अनेक काळापासून सुरु आहेत. हवामानाचा...