AYODHYA : अयोध्येत मशीद बांधणार? रामलल्लाच्या अभिषेक दरम्यान मुस्लिम पक्षाची घोषणा

अयोध्या | 22 जानेवारी 2024 : अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेमुळे संपूर्ण अयोध्या उजळून निघाली आहे. मात्र, याच दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर निकला दिला. वादग्रस्त जागेवर मंदिर बांधले जाईल, तर मुस्लिम पक्षाला मशीद बांधण्यासाठी जागेचा तुकडा दिला जाईल, असे आदेश न्यायालयाने दिले होते. […]

AYODHYA : अयोध्येत मशीद बांधणार? रामलल्लाच्या अभिषेक दरम्यान मुस्लिम पक्षाची घोषणा
ayodhya mosque
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar | Updated on: Jan 22, 2024 | 9:50 PM

अयोध्या | 22 जानेवारी 2024 : अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेमुळे संपूर्ण अयोध्या उजळून निघाली आहे. मात्र, याच दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर निकला दिला. वादग्रस्त जागेवर मंदिर बांधले जाईल, तर मुस्लिम पक्षाला मशीद बांधण्यासाठी जागेचा तुकडा दिला जाईल, असे आदेश न्यायालयाने दिले होते. याच जागेवर मशीद बांधण्याचा निर्णय मुस्लीम पक्षाने घेतला आहे अशी मोठी माहिती समोर आली आहे.

इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन विकास समितीचे प्रमुख हाजी अराफात शेख यांनी याची माहिती दिली आहे. पैगंबर मुहम्मद यांच्या नावावरून या मशिदीचे नाव ‘मस्जिद मुहम्मद बिन अब्दुल्ला’ ठेवण्यात येणार आहे. यासोबतच मशिदीसाठी पैसे उभारण्यासाठी क्राऊड फंडिंग वेबसाइटही सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अयोध्येतील भव्य मशिदीचे बांधकाम या वर्षी मे महिन्यापासून सुरू होईल आणि ते पूर्ण होण्यासाठी तीन ते चार वर्षे लागतील. अयोध्येतील धन्नीपूर गावात वाटप केलेल्या जमिनीवर प्रस्तावित मशीद बांधण्यात येणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

मशिदीसाठी पैसे उभारण्यासाठी क्राऊड फंडिंग वेबसाइट तयार केली जाणार आहे. तसेच, मशिदीचे नाव ‘मस्जिद मोहम्मद बिन अब्दुल्ला’ असे ठेवण्यात येणार आहे. लोकांमधील शत्रुत्व आणि द्वेष दूर करून त्याचे एकमेकांवरील प्रेमात रूपांतर करण्याचा आमचा प्रयत्न आहे असेही ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य करा किंवा करू नका. परंतु, आपण जर आपल्या मुलांना आणि लोकांना काही चांगल्या गोष्टी शिकवल्या तर ही सर्व लढाई थांबेल. मशिदीच्या डिझाइनमध्ये काही अधिक पारंपारिक घटक जोडायचे आहेत त्यामुळेच बांधकामाला विलंब झाला आहे असेही कारण त्यांनी दिले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us