लग्न सुरू असताना दुसऱ्याच मुलीला घेऊन वर बंद खोलीत गेला, त्यानंतर वधुनं केलं असं काही, संपूर्ण वऱ्हाडाला घाम फुटला
एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. लग्नाचे विधी सुरू असतानाच वर एका दुसऱ्याच मुलीला घेऊन बंद खोलीमध्ये गेला. मात्र त्यानंतर त्याच्या भावी पत्नीने जे केलं ते पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये आयोजित एका लग्न समारंभामध्ये चांगलाच राडा झाल्याचं पहायला मिळालं. ऐन लग्नाच्यावेळी तरुणीने तरुणावर असा आरोप केला, ज्यामुळे दोन्हीकडच्या वऱ्हाडी मंडळींना चांगलाच धक्का बसला. ज्या तरुणाचं लग्न होतं तो तरुण दुसऱ्याच एका मुलीला घेऊन एका रूमध्ये गेला होता, असा आरोप वधुने केला. ती एवढ्यावरच थांबली नाही तर हा तरुण त्या दुसऱ्या मुलीसोबत बंद खोलीत अर्धा तास होता, असा आरोपही तिने केला. त्यामुळे आता आपण हे लग्न करणार नाही, असं या तरुणीने म्हटलं आहे. या तरुणीला खूप समजावण्यात आलं, परंतु तरी देखील ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. आपल्याला हे लग्न मान्य नसल्याचं तिने म्हटलं.
दरम्यान या मुलीने लग्नाला नकार दिल्यानंतर शेवटी हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं, मात्र पोलिसांना देखील या प्रकरणात मध्यस्थी करण्यात यश न आल्याने शेवटी लग्न न करताच पुन्हा घरी परतण्याची वेळ या तरुणावर आली आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, फिरोजाबादमध्ये या लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं. ही तरुणी एटा येथील रहिवासी आहे, तर मुलगा हा फिरोजाबाद जिल्ह्यातलाच रहिवासी होता. हे लग्न फिरोजाबादमधे करण्याचं ठरलं होतं. त्यानुसार मुलीचे नातेवाईक मुलीला घेऊन फिरोजाबादमध्ये पोहोचले.
लग्नाचे सर्व विधी सुरू झाले. मात्र ऐनवेळी तरुणीने लग्नाला नकार दिला. तिने संबंधित तरुणावर गंभीर आरोप केले. आपला होणारा पती दुसऱ्याच एका मुलीला एका बंद खोलीमध्ये घेऊन गेला होता, तो तिथे तब्बल अर्धातास होता, असा आरोप या तरुणीने केला. त्यानंतर तिने हे लग्न करण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला. दोन्ही बाजूने तिची समजूत काढण्यात आली, परंतु ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. दरम्यान त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं. मात्र पोलिसांना देखील यावर तोडगा काढण्यात अपयश आलं. त्यानंतर मग लग्न न करताच शेवटी तरुणाला आपल्या घरी परतावं लागलं.