AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6 महिन्यानंतर शोधूनही नाही सापडणार, CJP बाबत भाजपच्या बड्या नेत्याचे भाकीत, म्हणाले काय?

कॉक्रोच जनता पार्टीविषयी भाजपच्या बड्या नेत्याने मोठे भाकीत केले आहे. हा डिजिटल पक्ष 6 महिन्यानंतर शोधूनही सापडणार नाही असा दावा या नेत्याने केला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांचे आंदोलन सीजेपीने हायजॅक केल्याचा आरोपही केला. त्यांच्या या दाव्यावर आता सीजेपी काय हल्लाबोल करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

6 महिन्यानंतर शोधूनही नाही सापडणार, CJP बाबत भाजपच्या बड्या नेत्याचे भाकीत, म्हणाले काय?
कॉक्रोच जनता पार्टी, अभिजीत दिपके
| Updated on: Aug 09, 2026 | 1:48 PM
Share

Brij Bhushan Sharan Singh on CJP: सीजेपी येत्या काही दिवसात देशभरात ‘क्या बोलती पब्लिक?’ ही मोहिम हाती घेत आहे. संपूर्ण देश ढवळून काढण्यासाठी आणि दबाव गट तयार करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकतीच कॉक्रोच जनता पार्टीने घोषणा केली. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते आणि कुस्ती महासंघाशी संबंधित माजी खासदार बृजभूषण सिंग यांनी कॉक्रोच जनता पार्टीवर मोठे भाकीत केले आहे. येत्या 6 महिन्यानंतर सीजेपी शोधूनही सापडणार नाही असा मोठा दावा त्यांनी केला आहे. एका वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना हा दावा केला.

माजी खासदाराचा सीजेपीला सल्ला काय?

बृजभूषण शरण सिंह यांनी कॉक्रोच जनता पार्टीला सल्ला दिला. त्यानुसार आता त्यांनी कोशातून बाहेर पडायला पाहिजे. जगाचा गाडा तुम्ही चालवत नाहीत. ही व्यवस्था तुम्ही चालवत नाहीत. कुणीही या भ्रमात अजिबात राहू नये. स्वतःला महत्त्वाचे समजू नका. हा विद्यार्थ्यांचा प्रश्न होता. त्यांची मागणी योग्य होती. पण सीजेपीने या चांगल्या प्रकरणाला दुसरेच वळण लावले. तिथे आंदोलन बदनाम करण्याचे आणि विद्यार्थ्यांना बदनाम करण्यामागे सीजेपी असल्याचा आरोप बृजभूषण सिंग यांनी केला.

मुलांचे आंदोलन CJP ने केले हायजॅक

या कार्यक्रमात बृजभूषण शरण सिंह यांनी कॉक्रोच जनता पक्षावर मोठे आरोप केले. सीजेपीच्या नेत्यावर बोलताना त्यांनी टीका केली. यांची काहीएक किंमत नाही. हे अजून सहा महिन्यानंतर हा पक्ष शोधूनही सापडणार नाही, असा दावा त्यांनी केला. तर त्याचवेळी पक्ष स्थापन करून निवडणूक लढवून दाखवावी असे आवाहन त्यांनी सीजेपी नेत्यांना दिले.

कॉक्रोच जनता पार्टीचे कोणतेही भविष्य नाही. त्यांनी तरुणांचे आंदोलन हायजॅक केले. जर आंदोलन तरुणांचे, विद्यार्थ्यांचे असते तर तिथे वाहनांची नासधूस झाली नसती. कोणत्याच मुलाने वाहन तोडफोड केलेली नाही. भाजप हा Gen-Z समोर झुकला नाही तर या विद्यार्थ्यांसाठी तो झुकला, असे वक्तव्य माजी खासदारांनी केले.

दबाव गट म्हणून काम करणार

छत्रपती संभाजीनगरमध्ये सीजेपीची नुकतीच बैठक झाली. त्यात राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली. देशभरातील काही सदस्य या बैठकीसाठी उपस्थित होते. क्या बोलती पब्लिक ही मोहिम पक्ष सप्टेंबरपासून हाती घेणार आहे. त्यात लोकांचे मुद्दे आणि भावना जाणून घेण्यात येणार आहे. हा पक्ष राजकारणात उतरणार नसला तरी राजकीय समज वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. एक दबाव गट म्हणून काम करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी सांगितले.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत