VIDEO: यास चक्रीवादळ वेगानं पश्चिम बंगालच्या दिशेने; वस्त्यांमध्ये शिरलं समुद्राचं पाणी

| Updated on: May 26, 2021 | 1:02 PM

पाऊस नसूनही केवळ समुद्र खवळल्यामुळे आजुबाजूच्या वस्त्यांमध्ये पाणी वेगाने शिरत आहे. | yaas cyclone

VIDEO: यास चक्रीवादळ वेगानं पश्चिम बंगालच्या दिशेने; वस्त्यांमध्ये शिरलं समुद्राचं पाणी
Follow us on

कोलकाता: यास चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीलगत असणाऱ्या अनेक वस्त्यांमध्ये समुद्राचे पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. येथील दिघा परिसरात पाऊस नसूनही केवळ समुद्र खवळल्यामुळे आजुबाजूच्या वस्त्यांमध्ये पाणी वेगाने शिरत आहे. त्यामुळे लोकांची घरे आणि रस्त्यावरील गाड्या पाण्यात बुडताना दिसत आहेत. (yaas cyclone impact in West bengal heavy rain started sea leavel increases)

या पार्श्वभूमीवर किनारपट्टीच्या भागातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे. एनडीआरएफ आणि प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत. यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सध्या मंत्रालयात ठाण मांडून बसल्या आहेत. या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या किनारपट्टी भागातून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. तत्पूर्वी मंगळवारी संध्याकाळी जोरदार वाऱ्यांमुळे उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील नैहाती आणि हलिहारमध्ये अनेक घरांचे नुकसान झाले.

(yaas cyclone impact in West bengal heavy rain started sea leavel increases)