AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मरायला जातोय… मृत्यूपूर्वी फोन, भाजप आमदाराच्या घरीच जीवन संपवलं…; काय घडलं नेमकं?

एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. भाजप आमदाराच्या मीडिया सेलमधील एका तरुणाने जीवन संपवलं आहे. त्याने असं का केलं? कशासाठी केलं? मृत्यूपूर्वी तो कुणाच्या संपर्कात होता? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

मरायला जातोय... मृत्यूपूर्वी फोन, भाजप आमदाराच्या घरीच जीवन संपवलं...; काय घडलं नेमकं?
BJP MLA Yogesh ShuklaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 25, 2023 | 10:16 AM
Share

लखनऊ | 25 सप्टेंबर 2023 : लखनऊमधील भाजपचे आमदार योगेश शुक्ला यांच्या सरकारी निवासस्थानी एका तरुणाने जीवन संपवलं आहे. हा तरुण योगेश शुक्ला यांच्या परिचयाचा असल्याचं सांगितलं जातं. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूपूर्वी त्याने योगेश फोन केला होता. मी मरायला जातोय, असं त्याने योगेश शुक्ला यांना फोन करून सांगितलं होतं. हा फोन येताच आमदार योगेश शुक्ला यांनी तात्काळ पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. मात्र, या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे.

योगेश शुक्ला यांच्या फोननंतर पोलिसांनी तात्काळ योगेश यांच्या घरी धाव घेतली. पण पोलीस येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांना या तरुणाचा मृतहेद पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मिळाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. तसेच पोस्टमार्टमसाठी पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे.

मीडिया सेलमध्ये कामाला

या तरुमाने जीवन संपवलं तेव्हा फ्लॅटमध्ये कोणीच नव्हतं. आमदार योगेश यांच्या फ्लॅट नंबर 804मध्ये रात्री 11.30 वाजेच्या दरम्यान त्याने गळफास घेतला. मात्र, या तरुणाने असं का केलं? त्यामागचं कारण काय? तो योगेश यांच्या फ्लॅटवर आला कसा? याची माहिती पोलीस घेत आहेत. हा तरुण बारांबाकीच्या हैदरगड येथील रहिवासी असल्याचं सांगितलं जातं. तो योगेश शुक्ला यांच्या मीडिया सेलचं काम करत होता.

पोलीस तपास सुरू

पोलीस जेव्हा योगेश यांच्या फ्लॅटवर पोहोचली तेव्हा त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी दरवाजा ठोठावला तेव्हा आतून काहीच उत्तर आलं नाही. त्यानंतर पोलिसांना दरवाजा तोडावा लागला. पोलीस आत गेल्यावर आत या तरुणाचा मृतदेह दिसला.

कोणतीही चिठ्ठी नाही

फ्लॅटमध्ये कोणतीच चिठ्ठी सापडली नाही. कोणतीही संदिग्ध वस्तू सापडली नाही, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. पोलिसांनी या तरुणाचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. गेल्या काही दिवसात या तरुणाने कुणाकुणाशी संवाद साधला याची माहिती घेतली जात असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना