‘घरचं झालं थोडं अन् व्याह्यानं धाडलं घोडं’

'घरचं झालं थोडं अन् व्याह्यानं धाडलं घोडं'

स्वयंपाक घरात महिलांच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा आता घसरलेल्या भावामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात देखील पाणी आणू लागलाय. नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढल्याने भाव मोठ्या प्रमाणात घसरले असून अथक कष्टाने पिकविलेल्या कांद्याला मातीमोल भाव मिळाल्याने बळीराजा हवालदील होऊन खचलाय, तर काही कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. पाहुयात याच संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट… […]

Team Veegam

|

Jul 05, 2019 | 4:12 PM

स्वयंपाक घरात महिलांच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा आता घसरलेल्या भावामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात देखील पाणी आणू लागलाय. नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढल्याने भाव मोठ्या प्रमाणात घसरले असून अथक कष्टाने पिकविलेल्या कांद्याला मातीमोल भाव मिळाल्याने बळीराजा हवालदील होऊन खचलाय, तर काही कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. पाहुयात याच संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट… कांद्याला 13 पैसे किलोच्या भावाची बातमी आली आणि अंगावर काटाच आला. मातीत घाम गाळुन सुखाचे चार पैसे मिळतील याच आशेनं उत्पादन घेणारा बळीराजा, त्याची ही क्रुर थट्टाच म्हणावी लागेल. कांद्याची जागतिक बाजारपेठ म्हणून नाशिक जिल्ह्याला ओळखलं जातं. या जिल्ह्यातील लासलगाव बाजारसमितीत तर कांद्याला रुपया किलोचा भाव मिळाला, आजकाल मिठ देखील 1 रुपयाच्या वर विकलं जातं. हतबल होऊन शेतकऱ्यांनी महामार्ग अडवला, तिथे पोलासांच्या लाठीचार्जचा सामना त्यांना करावा लागला. इतकचं नाही तर विधिमंडळाच्या अधिवेशनात देखील याचे पडसाद उमटले. राष्ट्रवादीच्या आमदार दिपिका चव्हाण यांनी तर विधानसभेत चक्क कांद्याची माळ गळ्यात घालून आंदोलन केलं. पण यावर सरकार म्हणून ‘ब्र’ काढायला कुणी तयार नाही. याऊलट देशातले भाव गंडलेले असताना मात्र सरकार पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा कांदा आयात करतय. हे म्हणजे ‘घरचं झालं थोडं अन् व्याह्यानं धाडलं घोडं’ असचं आहे. देशातला शेतकरी आवक कमी असून देखील भाव नसल्यानं रडकुंडीला आलाय आणि सरकार त्याच्या जखमांवर मिठ चोळण्याचा प्रयत्न करतयं. तर बाजार समित्यांनी पुकारलेल्या संपामुळे कित्येक शेतकऱ्यांचा माल शेतात तयार होऊन पडलाय. गेल्या 4 वर्षात कधी झाले नाही एवढे हाल या सरकारच्या काळात झाले, असे शेतकरी बोलतात. किमान हमी भाव किंवा उत्पादन खर्च तरी निघावा अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकरी करतो. निम्या भागात दुष्काळ आहे. दुष्काळाचा सामना करत जपलेल्या पिकाला कवडीमोल भाव मिळाल्यानं सावकाराचे पैसै फेडणार कसे असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यापुढे निर्माण झालाय. कांद्याला एकरी 50 ते 60 हजार खर्च रुपये येतो. त्यामुळे पीक घ्यायला परवडत नाही. आडतमुक्त शेतकरी हे हिताचं धोरण राबवताना सरकारनं एक चांगल पाऊल उचललं. या निर्णयाचं शेतकरी वर्गाकडून स्वागतही झालं. पण आडतमुक्ती झाली असली तरी हमाली, मापाई, तोलाई, भाराई, वराई ही कुणाच्या पथ्यावर मारणार हा अनुत्तरीत राहिलेला एक प्रश्न? फळे भाजीपाला, कांदा-बटाटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर थेट विकण्यास सरकारनं शेतकऱ्यांना परवानगी दिल्यानं शेतकरी वर्ग सुखावला. हा माल कुठे, कसा आणि कधी विकायचा यामध्ये त्याचा पुरता गोंधळ उडतोय. तसेच बाजार समिती बाहेर माल विकण्यासाठी आवश्यक असलेली व्यवस्थाच उपलब्ध नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो. कांदा निर्यातीत जगात भारताचा तिसरा क्रमांक लागतो. दरवर्षी देशातून 7,17,185 मेट्रिक टनाच्या आसपास कांदा निर्यात केला जातो. एकूण कांदा निर्यातीत 90 टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. उर्वरित 10 टक्क्यांत कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांचा समावेश होतो. कांदा उत्पादक शेतकऱ्यानं उत्पादीत केलेला माल कधी चढ्या भावानं तर कधी नाईलाजास्तव कमी भावानं विकावा लागतो. भाव वाढले की माध्यमांच्या डोळ्यात पाणी येते. पण दुष्काळ असो वा सुकाळ अशा परिस्थीतीशी तडजोड करत स्व:तचा घाम गाळून उत्पादन केलेल्या मालापासून 4 पैसे मिळावे एवढीच माफक अपेक्षा बळीराजा ठेवतो. मालाची मागणी आणि त्याचे होणारे उत्पादन यावरुन कांद्याचा भाव ठरतो. उत्पादन कमी झालं तर भाव गगणाला भिडतात आणि उत्पादन जास्त झालं की भाव पडतात. तसंच कधी-कधी आडते आणि व्यापारी यांच्या संगणमतानं देखील भाव पाडले जातात. जिवनावश्यक वस्तुत समावेश करण्याचा निर्णय घेतला खरा पण किमान हमीभावाचं काय? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. कांदा जिवनावश्यक वस्तुत टाकणं म्हणजे ही एक प्रकारे शेतकऱ्यांची गळचेपी केल्यासारखं आहे. केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क माफ केलं. परिणामी कांदा निर्यातीला प्रोत्साहन मिळेल पण इथ तर निर्याती ऐवजी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून कांदा आयातीला प्राधान्य देवून शेतकऱ्याला जित मारण्याचा प्रकार दिवसाढवळ्या केला जातोय. शेतकरी बाजारात कांदा विकायला आणतो त्यावेळी बाजारभावाचा अंदाज घेत नाही. त्यामुळे असेल त्या भावात तो विकून मोकळा होतो. त्यात व्यापाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. बहुतेक आडते हे स्वत:हा माल खरेदी करुन परराज्यात पाठवतात. म्हणजे शेतकऱ्याला किती नफा होणार यापेक्षा आपल्या खिशात किती येणार याकडे त्यांचं लक्ष असतं. ज्या वेळेस बाजार समितीत आवक मोठ्या प्रमाणात होते. त्यावेळी तर यांचं चांगलंच फावतं. मेलेल्या मढ्यावरचं लोणी सगळेच खातात, मात्र इथे तर चालत्या बोलत्या मढ्यांवरचे देखील लोणी खाणाऱ्या गिधाडांची कमी नाही!!! संदीप जाधव, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, मुंबई

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें