रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा जगभरात डंका, 192 देशांमध्ये बघतायेत लोक, ओटीटीवर करतोय राज्य

रितेश देशमुखचा 3 तास 6 मिनिटांचा राजा शिवाजी या चित्रपटाने जगभरात घातलाय धुमाकूळ. या चित्रपटाने ओटीटीवर प्रदर्शित होताच जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.

| Updated on: Jul 15, 2026 | 3:45 PM
1 / 5
अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता रितेश देशमुखच्या महत्त्वाकांक्षी ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवल्यानंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांची पसंती मिळवत नॉन-इंग्रजी चित्रपटांच्या जागतिक क्रमवारीत तिसरे स्थान पटकावले आहे.

2 / 5
नेटफ्लिक्स इंडियाने अधिकृत सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'राजा शिवाजीची गर्जना आता जगभर घुमत आहे. नेटफ्लिक्सवरील नॉन-इंग्रजी चित्रपटांच्या जागतिक यादीत हा चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.' यामुळे ‘राजा शिवाजी’ हा सध्या नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या नॉन-इंग्रजी चित्रपटांपैकी एक ठरला आहे.

3 / 5
हा चित्रपट 26 जून 2026 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. प्रदर्शनानंतर अल्पावधीतच भारतासह विविध देशांतील प्रेक्षकांनी चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नेटफ्लिक्सवर स्पॅनिश, कोरियन, चिनी, थाई, इंग्रजीसह विविध भाषांतील चित्रपट आणि वेबसीरिज उपलब्ध असतानाही ‘राजा शिवाजी’ने जागतिक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

4 / 5
‘राजा शिवाजी’ हा मूळचा मराठी चित्रपट असून तो हिंदीसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यानेच केले आहे. त्याच्या समोर अभिनेत्री जेनेलिया देशमुख महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. याशिवाय संजय दत्त, विद्या बालन, अभिषेक बच्चन आणि फरदीन खान यांसारख्या दिग्गज कलाकारांनीही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

5 / 5
‘राजा शिवाजी’ हा मूळचा मराठी चित्रपट असून तो हिंदीसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यानेच केले आहे. चित्रपटाने यापूर्वी थिएटरमध्येही उल्लेखनीय यश मिळवले होते. 1 मे 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची निर्मिती सुमारे 75 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये करण्यात आली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सुमारे 130 कोटी रुपयांची कमाई करत मोठे व्यावसायिक यश संपादन केले.

Follow Us