29 भागाची प्रचंड सुपरहिट सीरिज, एकदा सुरुवात केली तर शेवटपर्यंत जागेवरून उठत नाहीत लोक

3 सीजन अन् 29 भागांची ही सीरिज ओटीटीवर करतेय राज्य. प्रत्येक भागातील सस्पेंस पाहून व्हाल थक्क. कथा इतकी सुपरहिट की एकदा बघायला सुरुवात केली तर शेवटपर्यंत बघत राहतो माणूस.

| Updated on: Aug 03, 2026 | 7:30 PM
1 / 5
ओटीटीवरील सर्वाधिक लोकप्रिय क्राइम-थ्रिलर मालिकांपैकी एक असलेल्या 'मिर्झापूर' या वेब सीरिजची लोकप्रियता आजही कायम आहे. 2018 पासून सुरू झालेल्या या मालिकेचे आतापर्यंत तीन सीझन आणि एकूण 29 भाग प्रदर्शित झाले असून आता प्रेक्षकांचे लक्ष चौथ्या सीझनकडे लागले आहे.

ओटीटीवरील सर्वाधिक लोकप्रिय क्राइम-थ्रिलर मालिकांपैकी एक असलेल्या 'मिर्झापूर' या वेब सीरिजची लोकप्रियता आजही कायम आहे. 2018 पासून सुरू झालेल्या या मालिकेचे आतापर्यंत तीन सीझन आणि एकूण 29 भाग प्रदर्शित झाले असून आता प्रेक्षकांचे लक्ष चौथ्या सीझनकडे लागले आहे.

2 / 5

उत्तर प्रदेशच्या पार्श्वभूमीवर आधारित या सीरिजमध्ये बाहुबली, गँगस्टर, सत्तासंघर्ष आणि सूड यांची दमदार कथा मांडण्यात आली आहे. प्रभावी कथानक, लक्षवेधी संवाद आणि दमदार व्यक्तिरेखांमुळे मिर्झापूरने प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे.

3 / 5

या मालिकेचा पहिला सीझन 2018 मध्ये, दुसरा 2020 मध्ये आणि तिसरा 2024 मध्ये प्रदर्शित झाला. पहिल्या सीझनमध्ये 9 भाग, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सीझनमध्ये प्रत्येकी 10 भाग आहेत.

4 / 5

तिन्ही सीझनला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या मालिकेत पंकज त्रिपाठी, अली फजल, रशिका दुग्गल, विजय वर्मा, श्वेता त्रिपाठी आणि दिव्येंदू शर्मा यांनी साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या.

5 / 5

दरम्यान, निर्मात्यांनी 'मिर्झापूर 4' च्या तयारीला सुरुवात केल्याची चर्चा आहे. तसेच 'मिर्झापूर'वर आधारित चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुढील वर्षी चौथा सीझन ओटीटीवर प्रदर्शित होण्याची चाहत्यांना मोठी अपेक्षा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us