6 मिनिटांचं प्रचंड रोमँटिक गाणं, 31 वर्षांपासून प्रत्येकाच्या प्लेलिस्टमध्ये, ऐकताच मनाला मिळते शांतता

6 मिनिटांचं प्रचंड लोकप्रिय गाणं, जे आजही लाखो लोकांच्या प्लेलिस्टमध्ये कायम दिसतं. गाणं ऐकताच मन होते शांत. तुम्ही ऐकलं का?

| Updated on: Jun 14, 2026 | 4:42 PM
1 / 5
1990 च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील गाण्यांना आजही विशेष स्थान आहे. त्या काळातील गाण्यांमध्ये असलेली साधी, सुरेल आणि मनाला भिडणारी धून लोकांच्या हृदयात कायमची घर करून राहिली आहे. अशाच गाण्यांपैकी एक म्हणजे 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉम्बे’ चित्रपटातील ‘कहना ही क्या’ हे गाणं.

2 / 5

पहिल्या नजरेतील प्रेम आणि न बोलताही भावना व्यक्त होण्याचा सुंदर अनुभव या गाण्यातून मांडण्यात आला आहे. सुमारे 6 मिनिटांचे हे गाणे आजही संगीतप्रेमींमध्ये तितकेच लोकप्रिय आहे.

3 / 5

रिलीज झाल्यानंतर या गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि आजही हिंदी चित्रपटसंगीतातील सर्वोत्तम प्रेमगीतांपैकी एक म्हणून त्याची गणना केली जाते. या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि त्या काळात त्याच्या लाखो प्रती विकल्या गेल्या.

4 / 5

आजच्या डिजिटल युगातही ‘कहना ही क्या’ या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. यूट्यूब आणि सोशल मीडियावर या गाण्याचे व्हिडिओ लाखो-कोट्यवधी वेळा पाहिले जातात.

5 / 5

तसेच अनेकजण या गाण्यावर रील्सही तयार करतात. तीन दशकांनंतरही या गाण्याची क्रेझ कायम असून, ते आजही प्रेक्षकांना प्रेम, भावना आणि सुरेल संगीताचा सुंदर अनुभव देत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us