लालबागच्या राजाच्या चरणी तीन दिवसांत 32 किलो सोनं अर्पण, किंमत ऐकून डोळे विस्फारतील

गणेशोत्सवाच्या दिवसांत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय मंडळी देखील येत असतात. लालबागच्या राजाच्या चरणी भक्त दान देखील भरभरुन करतात. आता समोर आलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांत 32 किलो सोनं राज्या चरणी अर्पण केलं आहे. तर जाणून घ्या 32 किलो सोन्याची किंमत किती आहे...

| Updated on: Sep 18, 2026 | 2:33 PM
1 / 5
मुंबईच्या लालबागच्या राजाच्या चरणी भक्तांचा ओघ लागला आहे. तिसऱ्या दिवशी लालबागच्या चरणी 53 लाख रुपयांचे दान झाले आहे. तर सोन्याबद्दल सांगायचं झालं तर, 32 किलो सोनं लालबागच्या चरणी भक्तांनी अर्पण केलं आहे.

मुंबईच्या लालबागच्या राजाच्या चरणी भक्तांचा ओघ लागला आहे. तिसऱ्या दिवशी लालबागच्या चरणी 53 लाख रुपयांचे दान झाले आहे. तर सोन्याबद्दल सांगायचं झालं तर, 32 किलो सोनं लालबागच्या चरणी भक्तांनी अर्पण केलं आहे.

2 / 5

आता 32 किलो सोन्याची किंमत किती रुपये आहे, असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल. जर 32 किलो (32,000 ग्रॅम) 24 कॅरेट सोनं धरलं, तर मुंबईतील आजच्या अंदाजे 15 हजार 343 रुपये प्रति ग्रॅम दराने विक्री होत आहे.

3 / 5

अशात 32 किलो सोन्याची किंमत 49 कोटी 9 लाख 76 हजार रुपये आहेत. जर 22 कॅरेट सोन्याबद्दल सांगायचं झालं तर, त्याची किंमत साधारण 45.01 कोटी असेल. तर ही किंमत ऐकून तुमचे देखील डोळे विस्फारतील.

4 / 5

पहिल्या तीन दिवसांत लालबागच्या राजाच्या चरणी भक्त मोठ्या प्रमाणात दान करत आहेत. कोणी पैसे, तर कोणी सोनं चांदी दान करत आहे. एवढंच नाहीतर, नवस पूर्ण करण्यासाठी देखील अनेक भक्त दान करत आहेत...

5 / 5

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रोज मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी जमलेली असते. गणेशोत्सवाचे 10 दिवस प्रत्येक सार्वजनिक मंडळात गणेश भक्तांची दर्शनासाठी गर्दी असते. केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील गणरायाचं दर्शन घेतलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us