6 मिनिटांचं गाणं, जे ऐकताच मनाला मिळतो सुकून, अनेकदा ऐकलं तरी भरत नाही मन, 44 वर्षांपासून सुपरहिट
बॉलिवूड इंडस्ट्रीमधील 6 मिनिट 5 सेकंदाचं प्रचंड लोकप्रिय गाणं, जे रिलीज होताच चाहत्यांच्या मनात उतरलं. ऐकताच मनाला मिळतो सुकून. अनेकदा ऐकलं तरी भरत नाही मन.

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गाणी आली आणि गेली, पण काही गाणी अशी असतात की ती काळाच्या पलीकडे जाऊन प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून राहतात. 1983 साली प्रदर्शित झालेल्या ‘मासूम’ या चित्रपटातील ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी’ हे असेच एक अजरामर गाणे आहे.

तब्बल 43 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. आजही संगीतप्रेमी हे गाणे तितक्याच आवडीने ऐकतात आणि विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

‘तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूं मैं...’ या ओळींनी सुरू होणारे हे गाणे जीवनातील संघर्ष, वेदना, प्रश्न आणि भावनिक गुंतागुंत अतिशय संवेदनशीलतेने मांडते. जीवनाबद्दलची नाराजी, त्याचवेळी त्याला समजून घेण्याची धडपड आणि मनातील संभ्रम या सर्व भावना या गाण्यात प्रभावीपणे व्यक्त झाल्या आहेत.

चित्रपटातील या गाण्यात बालकलाकार म्हणून जुगल हंसराज आणि उर्मिला मातोंडकर यांची झलक पाहायला मिळते. त्याचबरोबर चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी यांच्या दमदार भूमिका होत्या.

चार दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतरही ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी’ या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. रेडिओ, टीव्ही, संगीत मैफिली आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर हे गाणे आजही मोठ्या प्रमाणात ऐकले जाते.