या गाण्याचं संगीत ऐकू येताच लोक होतात वेडे, इतकं सुपरहिट की 46 वर्षांपासून सुपरहिट
फक्त संगीत ऐकलं तरी लोक या गाण्याचे वेडे होतात. इतकं सुपरहिट की 46 वर्षांपासून प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ. पांढऱ्या गाऊनमध्ये जीनत अमानने केलेलं सर्वांनाच घायाळ.

हिंदी चित्रपटसृष्टीतील काही गाणी अशी आहेत, ज्यांची लोकप्रियता अनेक दशकांनंतरही कमी झालेली नाही. 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कुर्बानी’ या चित्रपटातील ‘लैला ओ लैला’ हे गाणे त्यापैकीच एक आहे.
अभिनेत्री झीनत अमान यांचा पांढऱ्या गाऊनमधील ग्लॅमरस अंदाज, अभिनेता अमजद खान यांचे ड्रमवादन आणि फिरोज खान यांची दमदार उपस्थिती यामुळे हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते.
झीनत अमान या त्यांच्या आधुनिक फॅशन आणि बोल्ड अंदाजासाठी ओळखल्या जात होत्या. ‘कुर्बानी’मधील त्यांचा पांढऱ्या गाऊनमधील लूक आजही चाहत्यांच्या लक्षात आहे.
हा ग्लॅमरस लूक साकारण्यात सुंदरी खान यांचे महत्त्वाचे योगदान होते. त्या फिरोज खान यांच्या पहिल्या पत्नी होत्या. झीनत अमान यांना आधुनिक पद्धतीचे कपडे परिधान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यातही त्यांची भूमिका होती.
या गाण्याची लोकप्रियता इतकी होती की, शाहरुख खानच्या ‘रईस’ या चित्रपटात ‘लैला मैं लैला’ या नव्या रूपात ते पुन्हा सादर करण्यात आले. ‘लैला ओ लैला’ आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या गाण्यांपैकी एक मानले जाते.