जयललिता ते NTR … दक्षिणेतील 5 दिग्गज कलाकार जे बनले थेट मुख्यमंत्री, तिसऱ्या नेत्याचे नाव वाचून व्हाल चकित!

Celebrity CM : दाक्षिणात्य अभिनेता थलपति विजय 2026 विधानसभा निवडणुकीत तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात आहेत. त्यांच्या TVK पक्षाने शानदार कामगिरी केली आहे. आज आपण कोणकोणत्या सेलिब्रिटींनी मुख्यमंत्रीपद भूषविले आहे ते जाणून घेऊयात.

बापू गायकवाड | Updated on: May 04, 2026 | 4:18 PM
1 / 5
एम जी रामचंद्रन : एम.जी. रामचंद्रन तमिळ चित्रपटसृष्टीतील मोठे अभिनेते होते आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री होणारे पहिले अभिनेता होते. ते सलग तीन कार्यकाळ मुख्यमंत्री राहिले आणि सुमारे 10 वर्षे त्यांनी हे पद भूषवले.

एम जी रामचंद्रन : एम.जी. रामचंद्रन तमिळ चित्रपटसृष्टीतील मोठे अभिनेते होते आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री होणारे पहिले अभिनेता होते. ते सलग तीन कार्यकाळ मुख्यमंत्री राहिले आणि सुमारे 10 वर्षे त्यांनी हे पद भूषवले.

2 / 5

एम करुणानिधि : एम. करुणानिधी हे दक्षिणेतील प्रभावशाली नेते होते. त्यांनी सुरुवातीला चित्रपटांसाठी पटकथा लेखन केले आणि नंतर राजकारणात प्रवेश केला. 1969 ते 2011 या काळात त्यांनी एकूण 20 वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवले.

3 / 5

एनटी रामा राव : एन.टी. रामाराव हे भारतीय सिनेमातील दिग्गज अभिनेते मानले जातात. त्यांनी राजकारणातही यश मिळवले आणि 1983-84, 1984-89 आणि 1994-95 अशा तीन वेगवेगळ्या कार्यकाळात मुख्यमंत्री राहिले. त्यांनी सुमारे 300 चित्रपटांत काम केले आहे.

4 / 5

जे जयललिता : जे. जयललिता या साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि नंतर राजकारणात मोठे यश मिळवले. त्या सुमारे 14 वर्षे, सहा वेगवेगळ्या कार्यकाळात तमिळनाडूच्या मुख्यमंत्री राहिल्या.

5 / 5

जानकी रामचंद्रन : जानकी रामचंद्रन या साऊथ चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री होत्या आणि एम.जी. रामचंद्रन यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. त्यांनी 1988 साली काही आठवड्यांसाठी मुख्यमंत्रीपद सांभाळले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us