Aishwarya Rai | ‘त्या’ घटनेनंतर ऐश्वर्या राय हिच्या सुरक्षेसाठी 50 बॉडीगार्ड्स होते तैनात; अखेर सत्य समोर

मुंबई | 16 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री ऐश्वर्या राय गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. तरी देखील अभिनेत्रीच्या अनेक चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. पण एक काळ होता जेव्हा सर्वत्र ऐश्वर्या राय हिच्या सौंदर्याच्या चर्चा रंगायच्या. 'जोधा अकबर' सिनेमानंतर अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान अभिनेत्रीच्या सुरक्षेसाठी ५० बॉडीगार्ड्स तैनात होते. ज्यामागचं कारण देखील फार मोठं आहे...

| Updated on: Aug 16, 2023 | 11:32 AM
1 / 5
'जोधा अकबर' सिनेमा सिनेमात ऐश्वर्या राय आणि अभिनेता ऋतिक रोशन यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. सिनेमात ऐश्वर्या हिने राणी जोधा यांच्या भूमिकेला न्याय दिला होता. सिनेमातील अभिनेत्रीच्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनात घर केलं होतं,

'जोधा अकबर' सिनेमा सिनेमात ऐश्वर्या राय आणि अभिनेता ऋतिक रोशन यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. सिनेमात ऐश्वर्या हिने राणी जोधा यांच्या भूमिकेला न्याय दिला होता. सिनेमातील अभिनेत्रीच्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनात घर केलं होतं,

2 / 5

सिनेमातील ऐश्वर्या राय हिचं सौंदर्य वाढवण्यासाठी ऐश्वर्याला नकली नव्हे तर खऱ्या सोन्याच्या दागिन्यांनी सजवलं होतं. अभिनेत्रीचे सिनेमातील फोटो आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

3 / 5

सिनेमात ऐश्वर्यासाठी जवळपास २०० किलो सोन्याचे दागिने वापरण्यात आले होते. त्या दागिन्यांचं वजन सुमारे ४०० किलो होतं. मिळालेल्या माहितीनुसार, दागिने तयार करण्यासाठी ७० कारागिरांचा मोलाचा वाटा होता. एवढंच नाही यावेळी ऐश्वर्याच्या सुरक्षेसाठी तब्बल ५० बॉडीगार्डस तैनात होते.

4 / 5

ऐश्वर्याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, नुकताच अभिनेत्री Ponniyin Selvan 2 सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली होती. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील तगडी कमाई केली.

5 / 5

सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर ऐश्वर्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us