जुनं ते सोनं, 56 वर्षांपासून या रोमँटिक गाण्याची क्रेझ कायम, ऐकताच चेहऱ्यावर येतं हसू, मनाला मिळतो सुकून
बॉलिवूडमधील 5 मिनिटांचं 56 वर्षांपूर्वीच सर्वात रोमँटिक गाणं, ऐकताच होते प्रेमाची आठवण, चेहऱ्यावर येते हसू. मनाला मिळते शांती. आजही गाण्याची लोकप्रियता कमी झाली नाही.

हिंदी चित्रपटसृष्टीतील जुनी गाणी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्या काळातील गाण्यांमध्ये असलेली साधी, सुंदर शब्दरचना, भावनांना स्पर्श करणारे सूर आणि मनाला शांत करणारे संगीत यामुळे ही गाणी काळाच्या पलीकडे जाऊन अमर ठरली आहेत.

आजच्या डिजिटल युगातही सोशल मीडिया, यूट्यूब, म्युझिक अॅप्स आणि रेडिओवर ही गाणी मोठ्या आवडीने ऐकली जातात. अशाच सदाबहार गाण्यांपैकी एक म्हणजे 1970 साली प्रदर्शित झालेल्या ‘अभिनेत्री’ चित्रपटातील 'सा रे गा मा पा, गा रे मेरे संग मेरे साजना' हे गाणं.

हे गाणं तब्बल 56 वर्षांनंतरही संगीतप्रेमींच्या ओठांवर कायम आहे. गाण्याची धून कानावर पडताच अनेकजण नकळत ते गुणगुणू लागतात. जुन्या हिंदी गाण्यांच्या चाहत्यांसाठी हे गाणं आजही खास रोमँटिक म्हणून ओळखलं जातं.

या गाण्यातील हलकीफुलकी नोकझोक, सुरांमधील खेळकर संवाद आणि प्रेमळ वातावरण यामुळे हे गाणं अधिकच खास बनलं. 'सा रे गा मा पा' या स्वरांचा अतिशय सुंदर वापर या गाण्यात करण्यात आला आहे. त्यामुळे गाणं ऐकताच त्याची धून सहज लक्षात राहते.

संगीतप्रेमींना हे गाणं आजही तितकंच ताजं आणि आनंददायी वाटतं. अनेक जण हे गाणं आपल्या आवडत्या जुन्या गाण्यांच्या प्लेलिस्टमध्ये आजही जपून ठेवतात. त्या काळात रेडिओ माध्यमातून हे गाणं घराघरात पोहोचलं. लोक पुन्हा पुन्हा हे गाणं ऐकत आणि गुणगुणत असत.