68 वर्षांची आजी अन् नातू, दोघंही एकाच वर्षी 10 वी पास, इंदूताईचं यश पाहून तुम्हीही कौतुक कराल

आयुष्यातील महत्वाच्या टप्प्यांपैकी एक असलेल्या इयत्ता 10वीचा निकाल नुकताच लागला. चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यांर्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र यातच वर्धी जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एका आजीचंही विशेष कौतुक होतंय. लहानपणी शिक्षण पूर्ण करता आलं नाही, पण तो सल मनातून एका महिलेने नातवासोबत अभ्यास करत वयाच्या 68 व्या वर्षी 10वीची परीक्षा दिली आणि चांगल्या गुणांनी पासही झाल्या. त्यांची कहाणी प्रेरणादायी आहे.

| Updated on: May 15, 2025 | 11:58 AM
1 / 6
वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील जामनी येथील 68 वर्षांच्या इंदूताईंचं सध्या खूप कौतुक होतंय.

वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील जामनी येथील 68 वर्षांच्या इंदूताईंचं सध्या खूप कौतुक होतंय.

2 / 6

त्यांनी 68 व्या वर्षी नातवासोबत 10वीची परीक्षा दिली आणि ते दोघंही पासही झाले. सतरा नंबरचा फॉर्म भरून त्यांनी दहावीची परीक्षा दिली.

3 / 6

इंदूताई सातपुते असे माहेरचे नाव असून इंदूताई बोरकर असे सासरचे नाव आहे. प्रथम संस्थेने सर्वेक्षण केले असता संस्थेने दहावीच्या परीक्षेकरिता महिलांचे १७ नंबरचे फॉर्म भरून घेत त्यांनी शिकवणी घेतली. त्यात इंदूताई यांनी यश मिळवलं.

4 / 6

त्यांचा नातू धीरज बोरकरही यंदा 10वीला होता. त्या दोघांनी परीक्षा दिली. नुकत्याच लागलेल्या निकालात धीरजला 71 टक्के गुण मिळाले.

5 / 6

तर आजी इंदूताई यांना 51 टक्के मिळाले. 10 वीचा अभ्यास करताना काही अडचण आली तर त्यांचा नातू धीरज त्यांना मदत करायचा.

6 / 6

68 वर्षांच्या आजींनी या वयात चिकाटीने अभ्यास करत जे यश संपादन केलं ते प्रेरणादायी ठरत असून सर्व स्तरांतून त्यांचं कौतुक होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us