Maharashtra Tourism : छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले हे 7 किल्ले जे पाहून आताचे इंजिनीअर होतील अवाक

शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ले हे केवळ संरक्षणासाठी नव्हते, तर अभियांत्रिकी आणि नियोजनाचेही उत्तम उदाहरण मानले जातात. समुद्र, डोंगर आणि नैसर्गिक भौगोलिक रचनेचा वापर करून किल्ल्यांची बांधणी करण्यात आली होती.

| Updated on: Oct 03, 2026 | 10:29 PM
1 / 5
सिंधुदूर्ग किल्ला मालवण   अरबी समुद्रात, खडकाळ बेटावर बांधला गेला   समुद्राच्या लाटांचा मारा आणि खाऱ्या पाण्याचा दाब सहन करण्यासाठी या किल्ल्याचा पाया सीसे वितळवून भरण्यात आला आहे.यासाठी सुमारे ४,००० मण सीसे वापरले गेले होते. जेणेकरून पाया मजबूत राहिला आणि खाऱ्या पाण्यातही किल्ला भक्कमपणे उभा राहिल.

सिंधुदूर्ग किल्ला मालवण अरबी समुद्रात, खडकाळ बेटावर बांधला गेला समुद्राच्या लाटांचा मारा आणि खाऱ्या पाण्याचा दाब सहन करण्यासाठी या किल्ल्याचा पाया सीसे वितळवून भरण्यात आला आहे.यासाठी सुमारे ४,००० मण सीसे वापरले गेले होते. जेणेकरून पाया मजबूत राहिला आणि खाऱ्या पाण्यातही किल्ला भक्कमपणे उभा राहिल.

2 / 5

विजयदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग मराठा आरमाराचे मुख्य केंद्र असलेला जलदुर्ग समुद्राच्या पाण्याखाली किल्ल्यापासून काही अंतरावर एक कृत्रिम भिंत बांधण्यात आली आहे. ही भिंत समुद्रावरून येणाऱ्या कोणत्याही जहाजाला दिसत नसे.त्यामुळे शत्रूच्या बोटीवर लक्ष ठेवणे सोप्पे होते. तर मराठ्यांची छोटी आणी हलकी जहाजे या भिंतीवरून सहज निघून जात.

3 / 5

राजगड पुणे 26 वर्षे स्वराज्याची राजधानी या किल्ल्याची संजीवनी माची आणि सुवेळ माची ही मानवी इंजिनिअरिंगचा अद्भूत नमुना आहे.डोंगराच्या नैसर्गिक रचनेचा वापर करून अंत्यत अरुंद आणि खोल कड्यांवर दुहेरी तटबंदीची अशी रचना केले आहे जिथून शत्रू वर येणे जवळपास अशक्य होते

4 / 5

प्रतापगड किल्ला जावळीच्या घनदाट जंगलात, भोरप्या डोंगरावर या किल्ल्याची तटबंदी डोंगराच्या तीव्र उताराला समांतर अशी बांधली आहे. आजच्या काळातही इतक्या दुर्गम आणि घनदाट जंगलात जड दगड वाहून नेणे आणि कड्यावर भक्कम बुरूज उभारणे हे आत्ताच्या इंजिनिअर जमणे अशक्य आहे.

5 / 5

पद्मदुर्ग किल्ला समुद्राच्या मधोमध,लाटांचा प्रचंड मारा चालू असताना या किल्ल्याची कमळाच्या पाकळ्यांसारखी रचना करण्यात आली आहे. लाटांचा वेग आणि दाब कमी करण्यासाठी या रचनेचा खूप फायदा होतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us