AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Mega Block : प्रवाशांनो लक्ष द्या! रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या

मुंबईतील प्रवाशांनो लक्ष द्यावे. रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक असणार आह. त्यामुळे घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या.

Mumbai Mega Block : प्रवाशांनो लक्ष द्या! रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 21, 2026 | 8:37 AM
Share

मुंबईत उद्या तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर मेगब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील कामे करण्यात येणार आहेत. तसेच ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.मेगाब्लॉकमुळे तिन्ही मार्गांवरील लोकल रेल्वेच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी वेळापत्रक जाणून घ्या.

मध्य रेल्वेचं वेळापत्रक कसं असेल?

मध्य रेल्वे मार्गावरील सीएमएमटी येथून सकाळी 9.34 ते दुपारी 2.17 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्ध-जलद उपनगरीय रेल्वे सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गांवर वळण्यात येणार आहेत. तर या गाड्या पुढे ठाणे ते कल्याणदरम्यान सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. परंतु या गाड्यांना रेल्वे स्थानकांवर पोहोचण्यासाठी 10 मिनिटे उशिरा लागण्याची शक्यता आहे. कल्याणमधून सकाळी 10.28 ते दुपारी 2.58 या वेळेत सुटणाऱ्या अप फास्ट/ सेमी फास्ट उपनगरीय रेल्वे या कल्याण आणि ठाणे स्टेशनदरम्यान अप धीम्या मार्गावर वळण्यात येणार आहेत. तर या गाड्या नियोजित रेल्वे स्टेशनवर थांबतील. पुढे मुलुंड रेल्वे स्टेशनवर या गाड्या पुन्हा अप फास्ट मार्गावर वळण्यात येतील. तसेच संबधित स्टेशनवर

हार्बर मार्गाचं कसं असेल वेळापत्रक? 

हार्बर मार्गावरील सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान डाऊन हार्बर मार्गावर 10.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी / वांद्रे – सीएसएमटीदरम्यान अप हार्बर मार्गावर सकाळी 10.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत ब्लॉक असणार आहे. तर सीएसएमटीमधून सकाळी 10.10 ते सायंकाळी 4.47 या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन हार्बर सेवा आणि सकाळी 10.06 ते सायंकाळी 4.43 या वेळेत वांद्रे/गोरेगावच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन हार्बर सेवा रद्द करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर  पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.12 ते दुपारी 3.20 या वेळेत सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या ‘अप’ हार्बर लाईनवरील सेवा रद्द राहणार आहेत.  तसेच गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 9.13 ते सायंकाळी 5.13 या वेळेत सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या ‘अप’ हार्बर लाईनवरील सेवा रद्द राहणार आहेत. ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (फलाट क्रमांक 8) दरम्यान 20 मिनिटांच्या अंतराने विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत.  ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा ठाणे – वाशी/नेरुळ – ठाणे स्थानकांदरम्यान वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहेत. पोर्ट लाईन (उरण लाईन) सेवा नेरुळ/बेलापूर – उरण – नेरुळ/बेलापूर स्थानकांदरम्यान वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहेत. हार्बर लाईनवरील प्रवाशांना सकाळी 9 ते सायंकाळी 6 या कालावधीत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची मुभा असणार आहे.

पश्चिम मार्गावर कसं असेल वेळापत्रक?

पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्टेशनदरम्यान रविवारी पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आलाय. या मेगाब्लॉकसाठी ब्लॉक अप आणि डाऊन धीम्या (स्लो) मार्गांवर सकाळी 10:35 ते दुपारी 3:35 वाजेपर्यंत असणार आहेत. ब्लॉकच्या कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यानच्या सर्व धीम्या मार्गावरील लोकल गाड्या फास्ट मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे काही अप आणि डाऊन उपनगरीय रेल्वे सेवा रद्द राहणार आहेत. तसेच, चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या काही लोकल गाड्या वांद्रे किंवा दादर स्टेशनपर्यंत चालवण्यात येणार आहेत.

Follow Us
DCM एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा
पंढरीत विठ्ठल नामाचा गजर! DCM एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा
अभिजीत पाटलांना थेट मंत्रिपदाची ऑफर, भरत गोगावलेंचं विधान चर्चेत
Bharat Gogawale : अभिजीत पाटलांना थेट मंत्रिपदाची ऑफर, भरत गोगावलेंचं विधान चर्चेत
टाळ-मृदंगाचा गजर अन् विठ्ठल नामाचा जयघोष! कार्तिकी एकादशीला पंढरपूर...
टाळ-मृदंगाचा गजर अन् विठ्ठल नामाचा जयघोष! कार्तिकी एकादशीला पंढरपूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली
रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त....
Ratnagiri Liquor Seizure : रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त; हातखंबा येथे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
Sanjay Shirsat : बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराज असल्याची चर्चा
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
Chandrashekhar Bawankule : जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती आयकर विभागापर्यंत पोहोचणार
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
Mumbai Water : दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
Eknath Shinde Helicopter : पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?