
2014 मध्ये पंतप्रधान मोदींनी पांढरा हाफ बाही असलेला खादी कुर्ता आणि चुडीदार पायजमा परिधान केला होता. यासोबतच त्यांनी भगवा आणि हिरवा जोधपुरी बांधेज फेटा बांधला होता

2015 मध्ये पीएम मोदींनी क्रीम रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा चुडीदार पायजमा घातला होता, तसेच पंतप्रधानांनी खादी रंगाचे जाकीटही परिधान केले होते. पीएम मोदींनी केशरी बांधणीचा फेटा बांधला, ज्यावर लाल आणि हिरवे पट्टे होते.

2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साधा कुर्ता आणि चुरीदार पायजमामध्ये दिसले होते. याशिवाय लाल-गुलाबी आणि पिवळ्या रंगाचा राजस्थानी फेटा बांधला होता.

2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाफ बाही कुर्ता परिधान केला होता. यावर्षी पंतप्रधानांनी चमकदार लाल आणि पिवळा फेटा घातला होता. या पगडीत मागे एक लांबट कापड बाहेर येत होते. जे खूप आकर्षक होते.

2018 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फुल बाहीचा कुर्ता पायजमा घातला होता आणि त्यासोबत त्यांनी उपर्णाही घातली होती. यावर्षी पंतप्रधानांनी गडद भगवा आणि लाल फेटा घातला होता.

2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाफ बाही कुर्ता, पायजमाघातला होता. त्यावर पंतप्रधानांनी पिवळा, लाल आणि हिरव्या रंगाचा लेहेरिया पॅटर्न असलेला फेटा घातला.

2020 सालाबद्दल बोलायचे तर त्याने भगवा आणि क्रीमकलरची टोपी घातली होती. पंतप्रधानांनी हाफ बाही असलेला कुर्ता, पांढरा वरचा भगवा बॉर्डर असलेला एक फेटा परिधान केला होता.

2021 मध्ये पीएम मोदींनी भगव्या रंगाचा फेटा घातला होता. या फेट्याचा रंग व कुर्त्यांचा रंग मॅच होत होता.