जिद्द असेल तर वय कसलं आडवं येतंय! जेजुरीत 99 वर्षांच्या आजोबांनी दिली ‘साक्षरते’ची परीक्षा
शिक्षण हा प्रत्येकाचा मुलभूत अधिकार आहे. आजच्या काळात ज्याच्याकडे विद्या तोच सर्वश्रेष्ठ सजला जातो... तर असे देखील अनेक लोक आहेत, ज्यांना वेळेत त्यांचं शिक्षण पूर्ण करता आलं नाही. पण त्यांनी जिद्द सोडली नाही. असंच जेजुरीत झालं आहे... जेजुरीत 99 वर्षांच्या आजोबांनी 'साक्षरते'ची परीक्षा दिली आहे.

"शिकायला वय लागत नाही, फक्त जिद्द लागते,"हे जेजुरीतील 99 वर्षांच्या आजोबांनी कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. शासनाच्या 'उल्लास नवभारत साक्षरता' मोहिमेअंतर्गत रविवारी पार पडलेल्या परीक्षेत, सदाशिव कोंडीबा साळवे या 99 वर्षीय वृद्धाने उत्साहात सहभाग नोंदवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले...

शिक्षण हा प्रत्येकाचा मुलभूत अधिकार आहे. आजच्या काळात ज्याच्याकडे विद्या तोच सर्वश्रेष्ठ सजला जातो. जेजुरी येथील जिजामाता महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर दोन विलक्षण परीक्षार्थी होते.

यामध्ये 99 वर्षांचे सदाशिव कोंडीबा साळवे (रा. लवथळेश्वर) आणि 75 वर्षांच्या विमल मारुती शिंदे (रा. जेजुरी) यांचा समावेश होता. आयुष्याची संध्याकाळ सुरू असतानाही, अक्षरांची ओळख करून घेण्याच्या या ओढीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पुरंदर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी गोविंद लाखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात एकूण 51 परीक्षार्थींनी ही परीक्षा दिली. ज्यांचे शिक्षण अपूर्ण राहिले आहे किंवा ज्यांना लिहिता-वाचता येत नाही... त्यांनी परीक्षा दिला.

ज्यांना लिहिता-वाचता येत नाही अशा व्यक्तींना साक्षर करण्यासाठी पंचायत समितीच्या वतीने हे अभियान राबवले जात आहे.शंभरीच्या उंबरठ्यावर असलेल्या साळवे आजोबांनी 'मला साक्षर व्हायचंय' हा जो संदेश दिला आहे, तो आजच्या तरुण पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.