Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या 4 सिक्रेट टिप्स, हॉस्पिटलमध्ये जायची वेळच येणार नाही; बाहेरचं खात असाल तर…
बाहेर जेवायला जाताना तुकाराम मुंढे यांनी सांगितलेल्या या ४ सिक्रेट्स टिप्स लक्षात घ्यायला हव्यात अन्यथा तुमचे आरोग्य खराब होण्याची शक्यता असते. कोणत्या या टिप्स वाचूयात...

आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे हॉटेलिंगचे प्रमाण वाढले आहे. विकेण्ड असो वा कोणताही खास क्षण लोक मित्र आणि परिवारासोबत बाहेर हॉटेलात जेवणे पसंद करतात. मात्र, बाहेरील जेवण अनेकदा आपल्या आरोग्याला त्रासदायक ठरु शकते. अलिकडेच महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने ( FDA ) अन्न भेसळखोरांवर कारवाई सुरु केल्याने आता जेवणाच्या ठिकाणची स्वच्छतेविषयी जागृती निर्माण होत आहे.
महाराष्ट्र FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे हे कठोर शिस्तीचे आणि नॉकरप्ट अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी एका खाजगी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ग्राहकांना हॉटेलात जेवण करण्याआधी नेमकी काय काळजी घ्यावी याच्या टिप्स दिलेल्या आहेत.
बाहेर जेवताना या चार गोष्टींची काळजी घ्या ( Tukaram Mundhe Checklist )
1. जास्त तेल, साखर तसेच मैद्याच्या पदार्थांना टाळा-
तुकाराम मुंढे यांच्यानुसार बाहेर जेवताना जास्त फॅट, साखर – मीठ असलेले पदार्थ खाऊ नका. कधी तरी असे जेवण करण्यास काही हरकत नाही. मात्र, रोज असा आहार खाणे प्रकृतीवर परिणाम करते. जर तुम्ही रोज असे अनहेल्दी अन्न सेवन केले तर तुमचे शरीर आजाराचे माहेर घर बनेल. त्यामुळे आहार हा समतोल असायला हवा.
2. स्वच्छतेची काळजी घ्या –
रेस्टॉरंट जातना सर्वात आधी हायजिन पाळायला शिका. अस्वच्छ वातावरणात जेवण केल्याने आजारी पडण्याचा धोका असतो असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे. अस्वच्छ भांडी, माशांचा वावर, अस्वच्छ परिसरात बॅक्टेरिया पसरु शकतात. ज्यास क्रॉस-कंटामिनेशन म्हणतात. अशा जेवणाने फूड पॉयझन किंवा पोट खराब होऊ शकते. तसेच उलट्या जुलाब देखील होऊ शकतात. त्यामुळे चारी बाजूंनी स्वच्छ परिसर असलेल्या ठिकाणीच जेवण घ्यायाला जावे.
3. नेहमी परवाना असलेल्या ठिकाणी जावे-
तुम्ही ज्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी जात आहात त्याला सरकारने परवाना दिला आहे का ? त्याचे रजिस्ट्रेशन झाले आहे का ? हे पाहायला हवे, तुकाराम मुंढे यांच्या मते अशा परवाना धारी जागी नियमांचे आणि स्वच्छतेची अधिक काळजी घेतली जाते. मात्र, याचा अर्थ असा नाही की लायसन्स नसलेल्या ठिकाणी पदार्थ स्वच्छ नसतात. मात्र, लायसन्स असेल तर हा विश्वास असतो की नियमांचे पालन करत आहेत.
4. वयानुसार आहाराची निवड करावी –
तुकाराम मुंढे यांनी चौथी टिप्स महत्वाची आहे.तुमचे वय आणि शरीराची गरज पाहूनच आहार घ्यावा. मग तुम्ही घरी जेवत असाल किंवा बाहेर महागड्या हॉटेलात. तुमच्या वयानुसार शरीराला वेगवेगळ्या पोषक तत्वांची गरज असते. तरुणपणी जो आहार सहज पचतो तो वाढत्या वयात पचेलच असे नाही. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहार सकस आणि निरोगी तसेच वयानुसार घ्यायला हवा.
