
कृति खरबंदा हिच्यासोबत पुलकित सम्राट दुसरे लग्न करतोय. हे दोघे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मात्र, पुलकित याच्यावर पहिल्यादा पत्नीने गंभीर आरोप केले.

पुलकित सम्राटचे पहिले लग्न हे श्वेता रोहिरा हिच्यासोबत झाले. श्वेताला सलमान खान हा आपली बहीण मानतो. तो पुलकित आणि श्वेताच्या लग्नात उपस्थितही होता.

पुलकित सम्राट आणि श्वेताने 2014 मध्ये लग्न केले. लग्नानंतर यांचा संसार फार दिवस टिकू शकला नाही. एक वर्षातच यांच्यात वाद झाला.

यानंतर श्वेता पुलकितवर गंभीर आरोप करताना दिसली. यामी गाैतममुळेच घटस्फोट झाल्याचे श्वेताने थेट म्हटले. पुलकितने घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान थेट एका फोटोग्राफरलाच मारहाण केली.

श्वेता आणि पुलकित हे दोघेही एकमेकांवर गंभीर आरोप करताना दिसले. पुलकित त्याच्या पर्सनल लाईफमुळे कायमच चर्चेत असतो. वादात देखील अडकतो.