थर न लावता विहिरीवर उडी मारत दहीहंडी फोडण्याची अनोखी प्रथा पाहिलीय का ?

दहीहंडी फोडताना एकीकडे एकावर एक मानवी थर रचत माखन लुटणारे गोंविदा महाराष्ट्रात अनेक शहरात दिसतात.परंतू मुंबईत एकीकडे नऊ ते दहा थर लावून विक्रम केला जात असतानाच आता रायगडच्या कुर्डुसची विहीरीवरील थरारक दहीहंडी गाजत आहे.

| Updated on: Sep 05, 2026 | 7:43 PM
1 / 5
 दहीहंडी म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते उंचच उंच मानवी मनोरे रचून माखन लुटण्याची शर्यंत डोळ्यासमोर येते. या थरारक मानवी मनोऱ्यांना दही हंडी फोडताना पाहाताना शरीरावर रोमांच उभे रहातात.  मात्र, रायगडच्या अलिबाग तालुक्यातील कुर्डूस गावात दहीहंडी फोडण्याची पद्धतच अनोखी आहे.

2 / 5

मात्र, रायगडच्या अलिबाग तालुक्यातील कुर्डूस गावात दहीहंडी फोडण्याची पद्धत अत्यंत अनोखी आहे. इथे ना मानवी मनोरे, ना उंच क्रेन... तर थेट विहिरीच्या कठड्यावरून उडी मारत दहीहंडी फोडली जाते.

3 / 5

तब्बल ३३ वर्षांपासून ही थरारक परंपरा कुर्डूस गावात सुरू आहे. १९९२ मध्ये सुरू झालेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहाने जपली जाते.

4 / 5

विहिरीच्या मधोमध बांधलेल्या हंडीपर्यंत पोहोचण्यासाठी गोविंदा कठड्यावरून उडी घेतात आणि हंडी फोडता अनेकदा गोविंदा थेट विहिरीच्या पाण्यात पडतात.

5 / 5

या अनोख्या दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी रायगडसह मुंबई, पुणे आणि इतर भागांतूनही नागरिकांची गर्दी होते. त्यामुळे कुर्डूसची ही विहिरीवरील दहीहंडी आता महाराष्ट्रातील आगळ्यावेगळ्या दहीहंडी उत्सवांपैकी एक ठरली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us