Laxmikant Bendre First Wife : ‘मी तिच्यावर बंदी घातलीच नव्हती पण…’, लक्ष्मीकांत बेर्डे पहिल्या बायकोबद्दल स्पष्टच म्हणालेले कारण…
Laxmikant Bendre First Wife : लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या बायकोबद्दल फार कोणाला माहिती नाही, पण एका मुलाखतीत त्यांनी बायकोबद्दल स्पष्ट वक्तव्य केलं होतं, म्हणालेले, 'मी तिच्यावर बंदी घातलीच नव्हती पण...', जाणून घ्या नेमकं काय आणि का म्हणालेले लक्ष्मीकांत बेर्डे...

Laxmikant Bendre First Wife : दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या असंख्य आठवणी आजही चाहत्यांच्या लक्षात आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एक काळ गाजवला याबद्दल सर्वांना माहिती आहे. फक्त मराठी सिनेविश्वातच नाही तर बॉलिवूडमध्ये देखील लक्ष्मीकांत बेर्डे यांनी स्वतःचं नाव मोठं केलं. आजही त्यांचे सिनेमे चाहते तितक्याच आवडीने पाहतात. लक्ष्मीकांत बेर्डे यांचं प्रोफेशनल आयुष्य कायम चर्चेत राहिलं, पण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या दुसऱ्या पत्नीबद्दल आणि त्यांच्या दोन मुलांबद्दल सर्वांना माहिती आहे. पण त्यांच्या पहिल्या पत्नीबद्दल फार कोणाला माहिती नाही. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या पत्नीचं नाव रुही बेर्डे असं होतं. पण गंभीर आजारामुळे त्यांचं निधन झालं.
एक काळ असा होता, जेव्हा इंडस्ट्रीमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे आणि रुही बेर्डे यांच्या नात्याच्या चर्चा रंगलेल्या असायच्या. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन देखील शेअर केली. पण लग्नानंतर रुही यांनी सिनेमात काम करणं बंद केलं. यावर एका मुलाखतीत लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मोठं वक्तव्य होतं. तर जाणून घ्या पहिल्या पत्नीबद्दल असं काय म्हणालेले लक्ष्मीकांत बेर्डे…
रुही बेर्डे लग्नाच्या आधी सिनेविश्वात काम करत होत्या, पण लग्नानंतर त्यांनी काम करणं बंद केलं यामागचं कारण काय? असा प्रश्न लक्ष्मीकांत बेर्डे यांना विचारलेला. यावर अभिनेते म्हणालेले, ‘तिने सिनेमात काम करणं का बंद केलं याबद्दल मला खरंच माहिती नाही. मी कधीच तिला काम करु नकोस म्हणून बंदी घातली नाही. कारण कोणताच कलाकार कोणावर बंदी घालत नाही… मला देखील कधी वाटलं नाही, तिने सिनेमात काम नाही केलं पाहिजे…’
पुढे लक्ष्मीकांत बेर्डे म्हणाले, ‘मला नाही माहिती तिने का काम करणं बंद केलं. पण पुढे माझाच इतका व्याप वाढत गेला, तेव्हा तिला कळंल की घर आता आपल्याला सांभाळायला हवं… नवरा आपला बाहेर जाऊन काम करतोय, यामुळेच तिने घरी राहण्याचा निर्णय घेतला असेल…’, असं देखील लक्ष्मीकांत बेर्डे म्हणालेले.
रुही बेर्डे यांचं निधन…
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या पत्नी रुही यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्या देखील मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. लक्ष्मीकांत यांच्यासोबत त्यांनी जवळपास 15 वर्ष संसार केला. पण अचानक रुही बेर्डे यांची प्रकृती खालावली आणि त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास सुरु झाला. अशात ड्रायव्हरने त्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पण काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 5 एप्रिल 1998 मध्ये रुही बेंद्रे यांचं निधन झालं.
सांगायचं झालं तर, पहिल्या पत्नीच्या निधनानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी दुसरं लग्न प्रिया बेर्डे यांच्यासोबत केलं. त्यांना दोन मुलं देखील आहेत. अभिनय बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे… त्यांचा मुलगा आज अभिनय विश्वात सक्रिय आहे. तर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी 16 डिसेंबर 2004 मध्ये अखेरचा श्वास घेतला.
