
दयाबेन अर्थात दिशा वकानी हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. तारक मेहता मालिकेत दिशा वकानी ही दयाबेनचे पात्र साकारत होती. लोकांना दयाबेनची भूमिका प्रचंड आवडते.

दिशा वकानी ही गेल्या काही दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. प्रेग्नंसीमुळे दिशा वकानीने तारक मेहता मालिकेतून ब्रेक घेतला.

आता दिशा वकानीला दोन मुले झाले आहेत. मात्र, अभिनेत्रीने अजूनही मालिकेत पुनरागमन केले नाही. सतत चाहते दयाबेन मालिकेत कधी परतणार हा प्रश्न विचारत आहेत.

सध्या एक चर्चा जोरदार रंगत आहे की, 65 कोटी दयाबेनला बिग बॉसचे निर्माते देण्यास तयार असताना देखील बिग बॉसच्या घरात सहभागी होण्यास दयाबेनने नकार दिला.

एका आठवड्याला बिग बॉसच्या घरात राहण्यासाठी दयाबेनला 4 कोटी मिळत होते. मात्र, एका रिपोर्टमध्ये सांगितले जात आहे की, अशी कोणतीही ऑफर दयाबेनला मिळाली नाही आणि इतके जास्त मोठे कोणत्याही शोचे बजेट नसते.