“मी या जगातील सर्वांत बेकार व्यक्ती”, असं का म्हणाली आमिर खानची लेक?

आमिर खानची लेक आयरा खान सध्या तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. मी या जगातली सर्वांत बेकार व्यक्ती आहे, असं आयरा म्हणाली. यावेळी आमिरसुद्धा तिच्यासोबत मुलाखतीत उपस्थित होता.

| Updated on: Apr 27, 2025 | 2:06 PM
1 / 5
आमिर खानची मुलगी आयरा खान नेहमीच तिच्या मानसिक स्वास्थ्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आयराने वयाच्या 27 व्या वर्षीही पैशांसाठी आईवडिलांवर अवलंबून राहिल्याबद्दल अपराधिपणा वाटत असल्याची भावना व्यक्त केली.

2 / 5
'पिंकविला' या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत आयरा म्हणाली, "मी 26-27 वर्षांची आहे, माझ्या आईवडिलांनी माझ्यावर खूप पैसे खर्च केले आहेत आणि या जगातली मी सर्वांत बेकार व्यक्ती आहे. मी काहीच काम करत नाहीये."

3 / 5
या मुलाखतीत आयरासोबत आमिरसुद्धा उपस्थित होता. कमाईविषयी आयराचं वक्तव्य ऐकल्यानंतर आमिर म्हणतो, "मानसिक स्वास्थ्याविषयीचं आमचं अगत्सु फाऊंडेशन सुरू करण्यापूर्वी ती काही पैसे कमवत नव्हती किंवा काही विशेष असं करत नव्हती असं आयराला म्हणायचं आहे. पण आयरा पैसे कमवत नाही, ही माझ्यासाठी कधी समस्याच नव्हती. त्याउलट तिने इतरांची मदत करण्याचं ठरवलंय ही खूप मोठी गोष्ट आहे."

4 / 5
"तू पैसे कमवत आहेस की नाही, हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. तू काम चांगलं करतेय हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. पैसा हा प्रत्यक्षात एक वचनपत्र आहे, ज्यावर प्रत्येकजण सहमत होण्याचा निर्णय घेतो. अन्यथा तो फक्त एक कागदाचा तुकडा आहे", असं आमिर पुढे म्हणाला.

5 / 5
आयरा खान ही आमिर आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांची मुलगी आहे. पहिल्या पत्नीपासून आमिरला दोन मुलं आहेत. रिना आणि आमिर यांचा मुलगा जुनैद हा वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनयक्षेत्रात काम करू लागला आहे.