Aamir Khan-Gauri Karwa Chauth: वयाच्या 61 व्या वर्षी आमिर खानचं तिसरं लग्नानंतर पहिलं करवा चौथ!
Aamir Khan-Gauri Karwa Chauth: आता गौरीसोबतच्या नव्या आयुष्यामुळे आमिर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वयाच्या 61व्या वर्षी त्याचं पहिलं करवा चौथ सेलिब्रेशन आणि पत्नीबरोबरची त्याची खास केमिस्ट्री चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. वयाच्या 61व्या वर्षी आमिर खानने तिसरं लग्न केल्यानंतर पत्नी गौरी स्प्रॅटसोबत पहिल्यांदाच करवा चौथ साजरा केला. या खास प्रसंगाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
विशेष म्हणजे, यावेळी आमिरचा साधा पण हटके लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. पत्नी गौरीचा हात हातात धरून आमिर करवा चौथच्या सेलिब्रेशनला पोहोचला होता.
दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिनेता अनिल कपूर आणि त्यांची पत्नी सुनीता कपूर यांच्या घरी करवा चौथच्या खास पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सेलिब्रेशनला बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकार आणि त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या.
याच कार्यक्रमात आमिर खान पत्नी गौरी स्प्रॅटसोबत सहभागी झाला होता. दोघांनीही पापाराझींसमोर एकत्र फोटोसाठी पोझ दिल्या. यावेळी आमिर गौरीचा हात धरून तिची काळजी घेताना दिसला. दोघांमधील खास बॉण्डिंग पाहून चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला आहे.
करवा चौथच्या सेलिब्रेशनसाठी आमिर खानने अतिशय साधा आणि आरामदायी लूक निवडला होता. त्याने प्रिंटेड शॉर्ट कुर्ता आणि ब्लॅक हरेम पँट परिधान केली होती. विशेष म्हणजे, या पारंपरिक लूकसोबत त्याने पायात साध्या चप्पल घातल्या होत्या. त्याच्या या साध्या पण हटके स्टाइलची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
तर दुसरीकडे पत्नी गौरी स्प्रॅटने या खास प्रसंगासाठी सुंदर बनारसी शरारा सूट परिधान केला होता. सटल मेकअप आणि साध्या स्टाइलमध्ये गौरी खूपच सुंदर दिसत होती. दोघांचे एकत्र फोटो सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
आमिर खानने याच वर्षी 5 जुलै 2026 रोजी गौरी स्प्रॅटसोबत लग्नगाठ बांधली. त्यामुळे लग्नानंतर दोघांचं हे पहिलंच करवा चौथ ठरलं. यापूर्वी आमिरचं रीना दत्ता आणि किरण राव यांच्यासोबत लग्न झालं होतं. रीना दत्ता यांच्यापासून त्याला जुनैद आणि आयरा ही दोन मुलं आहेत, तर किरण रावसोबत त्याला आझाद हा मुलगा आहे.