AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malaika Arora : ‘ही भारतात कधी बुरखा…’, मिस्ट्री मॅनसोबत मशिदीत मलायका अरोरा, नेटकऱ्यांकडून संताप

Malaika Arora : अरबाज खानसोबत घटस्फोट, अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप, हिरे व्यापाऱ्यासोबत अफेअरच्या चर्चा, मध्येत मिस्ट्री मॅनसोबत मशिदीत मलायका..., नेटकरी संताप व्यक्त करत म्हणाले, 'ही भारतात कधी बुरखा...', सर्वत्र मलायका हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Malaika Arora : 'ही भारतात कधी बुरखा...', मिस्ट्री मॅनसोबत मशिदीत मलायका अरोरा, नेटकऱ्यांकडून संताप
Malaika Arora
| Updated on: Oct 30, 2026 | 8:14 AM
Share

Malaika Arora : अभिनेता अरबाज खान याच्याकडून घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या अटींवर आलिशान आणि रॉयल आयुष्य जगत आहे. अरबाज खान याला घटस्फोट दिल्यानंतर मलायका हिने अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची जाहिर कबुली दिली. पण अरबाज याच्यासोबत देखील मलायका हिचं नातं फार काळ टिकलं नाही. दोघांच्या लग्नाची चर्चा सुरु असताना, दोघांचं ब्रेकअप झाल्याचं समोर आलं. एकदा तर माध्यमांसोबत बोलत असताना अर्जुन स्पष्टच म्हणालेला, मी आता सिंगल आहे. त्यानंतर मलायका हिचं नाव एका हिरे व्यापाऱ्यासोबत जोडलं जाऊ लागलं. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण मलायका हिने यावर अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

हिरे व्यापाऱ्यासोबत रिलेशनशिपची चर्चा रंगलेली असताना, एका मिस्ट्री मॅनसोबत मलायका हिचे काही फोटो व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असलेला फोटो अबू धाबी येथील शेख जायद ग्रँड मशिदीतील आहे. ज्यावर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर अनेकांना अभिनेत्राचा लूक आवडलेला आहे.

फोटो पाहिल्यानंतर संताप व्यक्त करत एक नेटकरी म्हणाली, ‘हिने कधी भारतात बुरखा घातला नाही.’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘हे स्वीकार करण्यासारखं मुळीच नाही.’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘मशिदीत चप्पल कोण घालतं…’, ‘खूप छान मलायका, पूर्ण कपड्यांमध्ये चांगली दिसत आहेस…’, अनेकांनी पोस्टवर कमेंट करत संताप व्यक्त केला आहे.

सांगायचं झालं तर, मलायका हिच्यासोबत दिसणाऱ्या मिस्ट्री मॅनचं नाव सर्वेश शशी असं आहे. त्यानेच स्वतःच्या इन्स्टाग्राम पेजवर मलायका हिच्यासोबत फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये थोडा यिन, थोडा यांग, आणि भरपूर प्रेम… असं लिहिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

कोण आहे सर्वेश शशी?

सर्वेश शाशी एक योग उद्योजक असून ‘SARVA’ या योग स्टुडिओ चेन आणि वेलनेस प्लॅटफॉर्मचा फाउंडर आहे. त्याने 2013 मध्ये ‘झोर्बा’ (Zorba) या योग स्टुडिओची सुरुवात केली होती, ज्याचं पुढे 2018 मध्ये ‘SARVA’ म्हणून रिब्रँडिंग करण्यात आलं. एवढंच नाही तर, सर्वेश याने 2018 मध्ये मलायका अरोरा हिच्यासोबत मिळून ‘दिवा योगा’ (Diva Yoga) देखील को-फाउंड केलं, जे महिलांसाठी योगवर लक्ष केंद्रित करणारा एक वेलनेस प्लॅटफॉर्म आहे.

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं