AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानपरिषदेच्या निकालानंतर बॅलेट पेपरबाबत रोहिणी खडसे यांचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या…

विधानपरिषदेच्या निकालानंतर बॅलेट पेपरबाबत रोहिणी खडसे यांन मोठं विधान केलं आहे. त्यांनी पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, अशी मागणी केली आहे.

विधानपरिषदेच्या निकालानंतर बॅलेट पेपरबाबत रोहिणी खडसे यांचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या...
rohini khadseImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 30, 2026 | 7:39 AM
Share

विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगली कामगिरी केली. महाविकास आघाडीने 5 पैकी 3 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. बॅलेट पेपरवरील निवडणुकांवर आम्हाला विश्वास आहे. परंतु बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास सरकार घाबरत असल्याचा आरोप देखील रोहिणी खडसे यांनी केला.

रोहिणी खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. रोहिणी खडसे म्हणाल्या, ‘विधान परिषदेच्या निवडणुकीत पाच पैकी तीन जागा महाविकास आघाडीने मोठ्या फरकाने निवडून आणल्या. हे नेते पदाधिकारी यांनी घेतलेल्या मेहनतीचा फळ आहे. लोकांनी दाखविलेला विश्वास आहे. आज महायुतीबाबत लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. विद्यार्थ्यांचे नाराजी आहे. पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. मात्र सरकार आरोपींना पाठिशी घालत असल्याचे दिसते. कारण विद्यार्थ्यांनी रस्त्यात येऊन आंदोलन केले. पण दोषींवर कारवाई झालेली दिसली नाही. पदवीधर मतदारांनी त्यांचा रोष मतदानातून व्यक्त केला. बॅलेट पेपरवरील निवडणुकांवर आम्हाला विश्वास असून या निवणुकांमध्ये महाविकास आघाडीला यश मिळते आहे.’.

महाराष्ट्रातील पक्षाच्या दौऱ्याविषयी खडसे म्हणाल्या,’महाराष्ट्रातील ग्रामीण भागात जर आपण अहवाल पाहिला आकडा काढला, तर मोठ्या प्रमाणात मुलींचे शिक्षण बंद करण्यात येत आहे. आर्थिक भुर्दंड परिवाराला सहन होत नाही, सहाजिक मुलाचे शिक्षण दिले जातात, तर मुलींचे शिक्षण बंद केलं जातं. ते पिढ्याने पिढ्या चालत आलेलं आहे. आजही आपण अनेक जिल्ह्यातील परिस्थिती बघतोय. कुपोषित बालकांची संख्या मोठी आहे. हे सगळं टाळण्यासाठी महिला आघाडीचा दौरा सुरू आहे. त्यातून समोर येणाऱ्या समस्या सरकार पुढे मांडण्यासाठी आमचे नेत्यांना सांगणार आहोत’.

‘ महाराष्ट्रात दिवसाचा महिलेचा रोजगार बुडू नये त्याकरिता म्हणून तिला मासिक पाळीचा त्रास होऊ नये, त्याकरिता तिची गर्भपिशवी काढून टाकण्यात येते, हे दुर्दैव म्हणावे लागेल. महाराष्ट्रात ही काही पहिली घटना नाहीये. यापूर्वी देखील ऊसतोड कामगार महिलांचे गर्भाशय काढण्यात आलेले आहे. याबाबत सरकारने लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे. आम्ही महिलांसाठी स्वतंत्र पॅकेजची मागणी करतोय. महिलांचा रोजगार जात असेल तर त्यांना सरकारकडून वेगळी मदत मिळावी, अशी मागणी असल्याचे खडसेंनी सांगितलं.

‘फायनान्स कर्ज वसुलीसाठी महिलांना त्रास देत असेल तर त्यांनी तक्रार करणे गरजेचे आहे.. ज्या फायनान्स कंपनी महिलांना कर्ज भरण्यासाठी प्रेशर करत असतील, त्या कंपन्यांवर गुन्हे नोंद होऊ शकतात. आता दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. सरकारने जबरदस्ती कर्ज वसुलीला स्थगिती दिलेली आहे. अशा परिस्थितीत जर कुठल्या महिलांना त्रास होत असेल तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षांना पदाधिकाऱ्यांना  संपर्क करा, आम्ही न्यायाचा प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं