अभिजीत दिपकेंचे मुळ गाव माहितीये का? गावात काय खास? फोटो आले समोर

Abhijit Dipke Village : गेल्या काही महिन्यांपासून अभिजीत दिपके हे नाव संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अभिजीत दिपके हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत, आज आपण त्यांच्या मुळ गावाची माहिती जाणून घेणार आहोत.

बापू गायकवाड | Updated on: Aug 07, 2026 | 7:18 PM
1 / 5
अभिजीत दिपके हे आई-वडिलांसह छत्रपती संभाजीनगरमध्ये वास्तव्यास आहेत. मात्र त्यांचे मुळ गाव हे हिंगोली जिल्ह्यात आहे. सध्या या गावात त्यांचे इतर नातेवाईक राहतात.

अभिजीत दिपके हे आई-वडिलांसह छत्रपती संभाजीनगरमध्ये वास्तव्यास आहेत. मात्र त्यांचे मुळ गाव हे हिंगोली जिल्ह्यात आहे. सध्या या गावात त्यांचे इतर नातेवाईक राहतात.

2 / 5

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांचे मूळ गाव हिंगोली जिल्ह्यात असून या गावाचे नाव संतुक पिंपरी असे आहे. हे गाव हिंगोली-परभणी राज्य महामार्गावर आहे.

3 / 5

संतुक पिंपरी हे गाव जरी दिपके यांचे असले तरी दिपके यांच बालपण आणि शिक्षण छत्रपती संभाजी नगर येथे झाले आहे, त्यामुळे त्यांच्या बालपणच्या आठवणी आणि मित्र परिवार दिपके यांचा छत्रपती संभाजी नगर मध्येच आहे.

4 / 5

अभिजीत दिपके यांच्या गावात इतर गावांप्रमाणे मंदिर आणि शाळा आहे, या गावाची लोकसंख्या मर्यादित असल्यामुळे वर्दळ कमी आहे.

5 / 5

संतुक पिंपरी या गावात दिपके यांचे नातेवाईक राहतात. मात्र अभिजीत दिपके हे या गावी खूप कमी वेळा आल्याची माहिती समोर आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us