
'यस्मिन् देशे न समनो न वृत्तिर्णं च बंधवह, न च विद्यागमोमप्यास्ति वसात्र न करायेत्' या श्लोकात आचार्य चाणक्यांनी (Acharya Chankaya) ज्ञानी व्यक्ती या ठिकाणी राहण्याचा विचारही मनात आणत नाही.

माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. त्यामुळे जिथे माणसाला आदर नाही, अशा ठिकाणी माणसाने राहू नये. आदर हा माणसाचा अलंकार आहे, जो वर्षानुवर्षे कष्टाने मिळतो.

जिथे आपूलकीची माणसं नसतात, जिथे लोक तुम्हाला समजून घेत नाही त्या ठिकाणी तुम्हा राहू नये. जिथे लोक फक्त तुमचा वापर करत असतील अशा ठिकाणी तर अजिबात राहू नये.

ज्या ठिकाणी रोजगाराचे साधन नाही अशा ठिकाणी राहणे देखील मूर्खपणाचे लक्षण आहे. माणसाच्या गरजा पैशानेच पूर्ण होतात. कमाईचे साधन नसेल तर माणसाचे जगणे कठीण होऊन बसते.

शिक्षणाचे साधन नसलेल्या ठिकाणी राहून उपयोग नाही. अशा ठिकाणी तुमच्या मुलाच्या आयुष्यावरही परिणाम होईल. त्यामुळे जिथे खूप काही शिकता येईल किंवा पूरक वातावरण असेल अशा ठिकाणीच राहा.

माणसाचा विकास तेव्हाच होतो जेव्हा तो वेगाने शिकतो आणि वेळेनुसार पुढे जातो. त्यामुळे ज्या ठिकाणी शिकण्यासारखे काही नाही, ती जागाही सोडून दिली पाहिजे.